करमाळा(प्रतिनिधी सविता आंधळकर):पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विदयापिठ सोलापुर यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रमा अंतर्गत आयोजीत प्रतापसिंह मोहिते- पाटील महाविद्यालयातील सुक्ष्मजीव शास्त्राची शैक्षणिक सहल अगदी उत्साहात पार पडली.विद्यार्थी व सुक्ष्मजीव विभाग प्रमुख डॉ. प्रविण देशमुख सर यांनी सतीश आपटे यांची पुणे येथील नामांकित कंपनी . “इम्युनो सायन्स प्रायवेट लिमीटेड” या कंपनी ला भेट दिली . विद्यार्थ्यांना शैक्षणिक जगातील वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते . यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोदवला होता.येथील गुणवत्ता हमी (QA) प्रमुख मिस. वर्षा , ललीत भालेराव सर आणि गुणवत्ता नियंत्रण (QC) प्रमुख स्वप्नील सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच या कंपनीचे संचालक आणि यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी “हजार लोकांना येत ते आपल्याला आलच पाहीजे परंतु हजार लोकांना जे येत नाही ते जेव्हा तुम्हाला येईल तेव्हाच तुम्ही जगाच्या मार्केट मध्ये उभा राहु शकाल” असे म्हणत शैक्षणीक सहलीचे महत्व पटवून दिले.
त्याच बरोबर शिवकालीन इतिहासाचे महत्व आणि निसर्गाचा आस्वाद लक्षात यावा म्हणून माहीती मुरुड, जंजीरा, प्रतापगड, अलीबाग, हरीहरेश्वर काशीद यांसारख्या ठिकाणी भेट देण्यात आली.सदर सहलीचे सुसज्ज असे आयोजन सुक्ष्मजीव विभाग प्रमुख डॉ. प्रविण देशमुख सर यांच्या द्वारे करण्यात आले.