पोलिसांनी लाच घेताना पकडण्यासाठी चक्क स्थानिक आमदारच बनले ट्रक चालक..

राज्याचं गृहखातं सध्या अनेक गोष्टींमुळं चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गृहखात्यावर (Home ministry) अनेक आरोप झाले आहेत. भ्रष्टाचारांच्या (Corruption) आरोपांनी राज्यात खळबळ माजली आहे.अशातच आता पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यासाठी सिनेस्टाईल स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आहे.भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिसांच्या अपप्रकाराची माहिती मिळाल्यावर स्वत: ट्रक चालवत या संपुर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. परिणामी मंगेश चव्हाण यांच्या या ऑपरेशननं राज्यात खळबळ माजवली आहे. गत काही दिवसांपूर्वी चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यावर दरड कोसळली होती. परिणामी कन्नड घाटातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली होती.
मंगेश चव्हाण यांनी ट्रक चालक होवून कन्नड घाटात चाललेला प्रकार उघडकीस आणला आहे. परिणामी या घटनेनं राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सर्वस्तरातून पोलिसांवर टीका होताना दिसत आहे. गाडी चालवत असताना पोलिसांनी चव्हाण यांना अडवलं आणि 500 रूपयांची मागणी केली. त्यानंतर काही कमी करा म्हणल्यावर कमी करतो म्हणूनही 500 रूपयांतील सुटे पैसे परत दिले नाहीत, अशी हकीकत चव्हाण यांनीच सांगितली आहे.दरम्यान, कन्नड भागातील गैरव्यवहार रोखण्यासाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनची चर्चा सर्वत्र आहे. मंगेश चव्हाण यांनी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here