पुणे – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून गेली आधीच वर्षातील मागील सरकारचा कारभार पाहता या सरकारकडून जनतेला देखील मोठ्या अपेक्षा आहेत.दरम्यान, या बंडामुळे शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असून अनेक नेते हे शिंदे गटाची वाट धरत आहेत. दरम्यान, आता सेनेपाठोपाठ कॉंग्रेस राष्ट्रवादीला देखील गळती सुरु होईल असे दिसत आहे. राज्यातील सत्तांतराचे पुणे महापालिका निवडणुकीतही पडसाद उमटू लागले असून महाविकास आघाडीतील माजी १८ ते २० नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाशी संपर्क साधला आहे अशी माहिती समोर येत आहेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते का, याची चाचपणी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपमधील जवळपास २० ते २२ नगरसेवक महाविकास आघाडीत जाण्याच्या तयारीत होते. मात्र, लांबलेल्या महापालिकेच्या निवडणुका आणि राज्यातील सत्तांतराचा भाजपला फायदा होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
Home Uncategorized पुण्यात महविकास आघाडीतील 18 माजी नगरसेवक भाजपाच्या वाटेवर ?शिंदे – फडणवीस जोडीचा...