गणेश घाडगे : मुख्य कार्यकारी संपादक.
निमगाव केतकी-निमगाव केतकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरेवस्ती या शाळेत परिसरातील ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.लसीकरणास ग्रामस्थांची रांग लागलेली पहावयास मिळाली.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या कवच कुंडल अभियान या मोहिमे अंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे.यावेळी वडापुरेवस्ती,करवंदीचा मळा,म्हेत्रेमळा,पाटीलवस्ती येथील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.नागरिकांना तृप्ती उबाळे यांनी लसीकरण केले.यावेळी याप्रसंगी निमगाव केतकीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ आदलिंग,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा शिंदे,इंदापूर शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक किरण म्हेत्रे,अंगणवाडी सेविका छाया भोंग,सरस्वती भोंग,सिंधु पाटील,मदतनीस मोनाली जाधव,मनिषा भोंग,पुनम सुतार,आशा सेविका संगिता बरळ,अनिता जाधव,झाकिया शेख,सपना देशमाने,राणी राऊत उपस्थित होते.