नंदिकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून देणार – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

👉 मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ
इंदापूर: प्रतिनिधी (दि.2/12/22)
नीरा नदीकाठी वसलेले प्राचीनकालीन श्री क्षेत्र नंदिकेश्वर मंदिर दगडवाडी हे इंदापूर तालुक्याचे भूषण असून, ऐतिहासिक असा अमूल्य ठेवा असून तो जतन करण्याची गरज आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम 7 महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. निरवांगी नजीक दगडवाडी (ता.इंदापूर) येथील नंदिकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते सोमवारी (दि. 28) करण्यात आला. प्रारंभी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मंदिरात पूजा व आरती करण्यात आली.हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, समाजाच्या प्रगतीसाठी धार्मिक अधिष्ठान महत्वाची भूमिका बजावत आहे. देवस्थानमुळे समाजावरती तसेच नव्या पिढीवर चांगले धार्मिक संस्कार होत आहेत. श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर व नंदिकेश्वर मंदिर यांचे ऐतिहासिक नाते आहे. नंदिकेश्वर मंदिराच्या शिखराचे काम हे अतिशय सुबक व दर्जेदार केले जाईल तसेच गाभाऱ्याच्या सुशोभीकरणाचे आकर्षक काम केले जाईल.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मंदिराच्या शिखराचे काम करणाऱ्या कारागिरांची चर्चा केली. याप्रसंगी दगडवाडीच्या सरपंच स्वाती केसकर, उपसरपंच दत्तात्रय पोळ, निरवांगीचे सरपंच संजय पोळ, दशरथनाना पोळ, रामदास रासकर, दत्तात्रय पोळ, महावीर गांधी, बबन रासकर, ज्ञानदेव माने, सचिन सहदेव रासकर, रणजीत रासकर, बाळू गायकवाड, छत्रपती काशीद, गोरख कुदळे, बाळासाहेब काशीद, राजू सूळ, सुनील कचरे, आप्पासाहेब पारेकर, किसन मोटे, विठ्ठल रासकर, प्रशांत काशीद, चांगदेव गुरव, सोपान माने आदींसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here