पाटस, ता. दौंड ते लोणी काळभोर, ता. हवेली या रस्त्याचा समावेश संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करावा.
जनता एक्सप्रेस मराठी न्युज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.7776027968
दौंड : आमदार अॅड. राहुल कुल यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली भेटी दरम्यान त्यांनी पुणे – सोलापूर महामार्ग, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज भक्ती मार्ग, बोरीबेल व खोरवडी येथे रेल्वे भुयारी मार्गला मंजुरी तसेच दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसंदर्भात चर्चा केली.
संत तुकाराम महाराज पालखीमध्ये सहभागी होत असलेल्या हजारो वारकरी बांधवांची सुरक्षितता, भविष्यातील वाढती वाहतुक व पालखी दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीस होणारा व्यत्यय टाळण्यासाठी कवडीपाट, लोणी काळभोर किमी ४० ते पाटस किमी १४० या रस्त्याचा समावेश श्री. संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करावा. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाला गती मिळावी व या मार्गामध्ये “भक्ती मार्गाच्या” धर्तीवर वारकरी बंधू भगिनींसाठी विविध आवश्यक सुविधा उभारण्यात याव्यात अशी मागणी आमदार अॅड. कुल यांनी नितीन गडकरी यांचेकडे केली आहे. यापूर्वी दौंड तालुक्यातील पाटस ते बारामती पर्यंतच्या रस्त्याचा समावेश पालखी मार्गात करण्यात आला असून, मोठ्या वाहनांच्या जास्त रहदारीचा टप्पा असलेल्या पाटस, ता. दौंड ते लोणी काळभोर, ता. हवेली या रसत्याचा समावेश संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करण्यात आला नाही.
यापूर्वी आमदार राहुल कुल यांनी केलेल्या मागणीनूसार राज्य महामार्ग ११८ – चौफुला – केडगाव – न्हावरा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग एन. एच – ५४८ डीजी म्हणून घोषित केला असुन या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने सुरु करण्यात यावे. दौंड तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतुन जाणाऱ्या पुणे – सोलापूर महामार्गावरील प्रलंबीत सर्व्हिस रोड व गटरचे सर्वेक्षण पूर्ण झाले असुन या कामाला सुरुवात करण्यात यावी. पुणे – सोलापूर महामार्गवरील मुख्य जंक्शनवर ओव्हर ब्रिज उभारण्यात यावेत, दाट लोकवस्ती व अपघात प्रवण क्षेत्र ओळखून रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्यात यावी. दौंड तालुक्यातील बोरिबेल तसेच खोरवडी येथे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत रेल्वे भुयारी मार्गला मंजुरी मिळावी आदी मागण्या देखील आमदार अॅड. कुल यांनी केल्या आहेत.आपण केलेल्या सर्व मागण्यांच्याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले असल्याचे आमदार अॅड. कुल यांनी यावेळी सांगितले.