पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस कुर्डुवाडी शहरात युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात आगळ्यावेगळ्या पध्दतीने रक्तदान शिबिर व विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.या वेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला व त्यानंतर भव्य अश्या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टी कुर्डुवाडी शहर व तालुक्यातीलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आला.
पंतप्रधान श्री.नरेंदजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे देशात व राज्यात मोठया प्रमाणात रक्तदान शिबिर व विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून भाजपा युवा मोर्चा माढा तालुका आयोजीत भव्य रक्तदान शिबीर भुषण लाॅजचा हाॅल टेंभुर्णी रोड कुर्डुवाडी येथे संपन्न झाले.या वेळी आयोजित रक्तदान शिबिरा मध्ये 176 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या वेळी जेष्ठ नेते गोविंद आबा कुलकर्णी युवक जिल्हाअध्यक्ष प्रकाश घोडके तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, महिला जिल्हा अध्यक्ष धनश्री ताई खटके, जयसिंग ढवळे,सुधिर भाऊ गाडेकर,अमोल कुलकर्णी, निलेश सुराणा, शंकर बागल, संतोष क्षीरसागर दतात्रेय मोरे महाराज, प्रकाश चोपडे ,गिरीश तांबे, विजय कोकाटे, प्रतीक्षा ताई गोफ़ने,बालाजी गायकवाड ,विक्रम बोरकर तसेच नवनियुक्त सर्व पधदिकारी व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी सूत्रसंचालन सुधीरभाऊ गाडेकर यांनी केले व उपस्थितांचे आभार आयोजक उमेश भाऊ पाटील यांनी मानले.
Home Uncategorized देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा माढा आयोजित...