दिवंगत बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंच्या स्मारकासाठी जागा द्या- नगरपालिकेस शिवसेनेच्या वतीने निवेदन.

इंदापूर शहरांमध्ये शिवसेनेचे वारे सध्या वाहू लागलेचे चित्र दिसत आहे मग ते मुख्यमंत्र्यांना हजारोंच्या संख्येने पत्र पाठवण्याचा विषय असो किंवा संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या स्थळांमध्ये गडबड झाल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांना करणे असो या ना त्या कारणातून शिवसेना नेहमीच चर्चेत राहत असल्याचे पाहायला मिळते.असाच आणखी एक मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून शहरप्रमुख अशोक देवकर यांनी शिवसैनिकांसह नगरपालिकेला एक निवेदन दिले आहे या निवेदनात हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे व दिवंगत आनंद दिघे यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची विनंती केली आहे. सदरच्या मागणीबाबत अशोक देवकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की “बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे हे आमचे दैवत आहेत या दोघांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी आपले आयुष्य घालवले आहे त्यामुळे त्यांचे स्मारक होणे महत्त्वाचे वाटते व त्यासाठी आमचे नेते विजयबापु शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून स्मारकासाठी निधी उपलब्ध करून घेता येईल पण जागा नसल्यामुळे त्यास अडथळा निर्माण होत आहे म्हणून नगरपालिकेने जर जागा दिली तर त्वरित निधीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून निधीची मागणी करता येईल व मुख्यमंत्री सुद्धा या दोघांना आराध्य दैवत मानत असल्याने ते त्वरित निधी देतील.” असे मत अशोक देवकर यांनी व्यक्त केले.यावेळी शिवसेना शहरप्रमुख अशोक देवकर,अवधूत पाटील( शिवसेना सोशल मीडिया इंदापूर तालुका प्रमुख), योगेश पवार,प्रसाद शेलार,राहुल निकम,राजु जाधव,नितीन निकम,आबा गंगावणे,सोनु ढावरे (उपशहरप्रमुख) दुर्वास शेवाळे आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here