तब्बल 46 वर्ष निकटवर्तीय असलेल्या ज.मा. आप्पा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवार पोहोचले निमगाव केतकीत..

प्रतिनिधी:संतोष तावरे

निमगाव केतकी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचे सर्वात निकटवर्ती मित्र जगन्नाथ अप्पा मोरे यांचे काल दुःखद निधन झाले होते. जगन्नाथ आप्पा व शरद पवार यांची मैत्री सर्वांना परिचित असून या आपल्या जवळच्या मित्राला श्रद्धांजली वाहण्यात करिता व मोरे कुटुंबाचे सांत्वन करण्याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे इंदापूर दौऱ्यावर आले होते. इंदापूर पंचायत समितीचे पहिले सभापती जगन्नाथराव मोरे यांच्या निमगाव केतकी येथील व बाबासाहेब पाटील यांच्या लासुर्णे येथील निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दोन्ही कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जमा अप्पांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जगन्नाथराव मोरे व शरद पवार यांची ४६ वर्षांची मैत्री होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पहिले जिल्हा अध्यक्ष होते.शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. ज.मा आप्पा मोरे यांचा हजरजबाबीपणा त्यांची एकनिष्ठता व नेत्यावर असलेले प्रेम या सर्व गोष्टी तालुक्याला माहित होत्या व आपल्या याच गोष्टीमुळे जमा आप्पा यांची एक विशिष्ट ओळख निर्माण झाली होती. आज शरद पवार यांनी जमा आप्पा यांच्या आजारपणा विषयी संपूर्ण माहिती घेतली व मोरे कुटुंबांना दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो असे मत त्यांनी व्यक्त केले.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here