चुकीच्या पद्धतीने मोजणी करून अन्याय केल्याच्या आरोपाखाली भूमी अभिलेख इंदापूर विभागाच्या विरोधात सपकाळवाडीकर करणार आंदोलन.

इंदापूर: अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करत ड्रोनच्या सहाय्याने भूमी अभिलेख विभागाने काल सकळवाडी गावाची मोजणी केली. ही मोजणी चुकीच्या पद्धतीने केल्याने आमच्यावर अन्याय होतोय असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. व यातूनच गावकरी भूमी अभिलेख विभागाच्या विरोधात ठाम उभे आहेत. गावकऱ्यांच्या मते एक चुकीच्या पद्धतीचा नकाशा तयार करण्यात आला असून त्यामध्ये सर्वे नंबरचा बांध सोडून ही मोजणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे गावातील 43 मिळकती रद्द केले आहेत. विशेष म्हणजे सकळवाडी ग्रामपंचायतने ड्रोन ची मोजणी रद्द करण्याबाबत ठराव सुद्धा केलेला आहे.
त्याचप्रमाणे गावकरी,शेतकरी राहत असलेल्या लोकांच्या घरासमोरील सर्व मोकळ्या जागा ह्या शासनाने ताब्यात घेऊन त्या जागेवर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव टाकून ते सरकार जमा केल्या आहेत त्यामुळे अशा अन्यायकारक पद्धतीने केलेली मोजणी रद्द करावी या मागणीसाठी 24 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या समोर सकळवाडीकर आंदोलन करणार आहेत. याच संदर्भातील निवेदन गावकऱ्यांनी नुकतेच तहसीलदार इंदापूर व संबंधित सर्व खात्यांना दिले आहे.
आता भूमी अभिलेख विभाग 24 फेब्रुवारी पर्यंत काय निर्णय घेणार व सपकळवाडीकरांना कशा पद्धतीने न्याय मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here