ग्रामपंचायत देऊळगाव राजे च्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी उपक्रम स्तुत्य आहे -सुनंदाताई राजेंद्र पवार

प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी
ग्रामपंचायत देऊळगाव राजे च्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त महिला मेळावा खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदाताई राजेंद्र पवार व सौ डॉ संगीता ताई वीरधवल जगदाळे पाटील उपस्थित होते.गावातील महिलांनी आर्थिक सक्षम बनावे व सर्व महिलांनी आरोग्य तपासणी करावी असे मार्गदर्शन सूनंदाताई पवार यांनी केले.ग्रामपंचायत वतीने गावातील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
या तपासणीमध्ये सासूबाईंना घेऊन येणाऱ्या 76 सुनबाईंना विशेष बक्षीस ग्रामपंचायत वतीने देण्यात आले.गावस्तरीय 35 महिला अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.आरोग्य तपासणी मध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.या वेळी बारामती येथील कुमार देवकाते यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता
यामध्ये सौ शुभांगी सोमनाथ अवचर, सौ शितल नारायण अवचर, सौ सोनाली भागवत खोसरे या 3 विजेत्या पैठणीच्या मानकरी ठरल्या.तसेच एकूण 50 बक्षिसे या खेळाच्या दरम्यान गावातील महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी असे भरगच्च कार्यक्रम घेणारे सरपंच सौ स्वाती अमित गिरमकर यांच्या कामाचे सर्व महिलांनी कौतुक केले.
यावेळी लक्ष्मी दयानंद पोळ,शुभांगी दादासो गिरमकर, चतुरा आप्पासाहेब खेडकर, वृषाली महादेव औताडे, सोनाली दिपक पासलकर, सुलोचना शिवाजी तावरे, जयश्री महादेव सूर्यवंशी, पूजा बाबू पासलकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अमीर शेख यांनी केले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here