इंदापूर नगरपालिका निवडणुक 2022 आरक्षण सोडत जाहीर,पहा प्रभागनिहाय आरक्षण.

इंदापूर तालुक्यातील राजकारण रंगतदार चर्चेत असतानाच इंदापूर नगरपालिका प्रभाग निहाय आरक्षण सोडत आज उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे व तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
इंदापूर नगरपालिका अंतर्गत 10 प्रभागातील एकूण 20 जागांपैकी 10 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.चैतन्य राजेंद्र धोत्रे या विद्यार्थ्यांच्या हातून सदरील अनुसूचित जाती आरक्षण सोडतीत 3 राखीव जागांसाठी सोडतीच्या चिठ्या काढण्यात आल्या.आज आरक्षण सोडत प्रक्रियामध्ये खालील प्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले.प्रभाग क्र. १: अ) अनुसुचित जाती स्त्री, ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. २ अ) सर्वसाधारण स्त्री ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ३ अ) : सर्वसाधारण स्त्री ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ४: अ) सर्वसाधारण स्त्री ब), सर्वसाधारण,
प्रभाग क्र.५: अ) सर्वसाधारण स्त्री ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ६: अ) सर्वसाधारण स्त्री ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ७: अ) सर्वसाधारण स्त्री ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ८: अ) सर्वसाधारण स्त्री ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ९: अ) अनुसूचित जाती स्त्री ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. १०: अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण , ब) सर्वसाधारण स्त्री…एकूणच आता या सर्व आरक्षण प्रक्रियेमुळे सर्व इच्छुक उमेदवारांची आप आपल्या ताकतीने आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी  धावपळ चालू राहील हे मात्र नक्की.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here