इंदापूर तालुक्‍यातील सर्वच निवडणुका शिवसेनेने ताकतीने लढण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याने इंदापूर तालुक्यात नवीन शाखा उद्घाटनाचा झंझावात.

इंदापूर:इंदापूर तालुक्यात निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना शह देण्याकरिता आता इंदापूर तालुक्यात तिसरा पर्याय म्हणून शिवसेनेकडे पाहिले जात आहे. गेल्या वर्षभरापासून शिवसेना तालुकास्तरीय दर आठवड्याला मीटिंग घेऊन शिवसेना वाढविण्यासंदर्भात पाठपुरावा करत असून दर महिन्याला जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय बैठक होऊन या बैठकीत सर्वच पदाधिकार्यांच्या समवेत तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा होऊन त्यातून मार्ग काढले जात आहेत. त्यामुळे शिवसेना आता प्रत्येक गावात पोहचली आहे. तालुकाप्रमुख नितीन शिंदे व त्यांची संपूर्ण टीम इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकापूर्वी आपल्या पक्षात सुसंवाद साधत व सर्वांना विचारात घेत शिवसेना वाढवत असल्याचे चित्र समोर येत आहे.इंदापूर तालुक्यात या काल व्याहाळी,कौठळी, शेळगाव,कचरवाडी, येथे त्याचप्रमाणे इंदापूर विधानसभा मतदार संघातील भिगवण- शेटफळगढे जि.प.गटातील मदनवाडी,विरवाडी, तक्रारवाडी, भिगवण वार्ड क्रमांक १, भिगवण स्टेशन, भिगवण वार्ड क्रमांक ३,डिकसळ येते नवीन शिवसेना शाखेची उद्घाटने तसेच निमगाव केतकी येथे संपर्क कार्यालय उद्घाटनही शिवसेनेने केले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी इंदापूर नगरपालिका,पंचायत समिती , जिल्हा परिषद निवडणूका पूर्ण ताकतीने लढण्याचे जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर व तालुकाप्रमुख नितिन शिंदे यांना गेल्या महिन्यात आदेश दिल्याने शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याने येणारी निवडणूक ही शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.काल झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये संपर्कप्रमुख मा.दयानंद शिंदे साहेब जिल्हाप्रमुख मा.महेशदादा पासलकर श्री. ‌विशाल बोंद्रे जिल्हासमन्वयक,श्री.भिमराव भोसले जिल्हा समन्वयक,श्री.संजय काळे उप जिल्हा ,तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी तालुका संघटक सुदर्शन रणवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरज काळे,तालुक समन्वयक अरुण पवार, युवासेना जिल्हा समन्वयक ॲड .राहुल बंडगर ,उपतालुकाप्रमुख फिरोज पठाण, उपतालुकाप्रमुख सुदर्शन साखरे, विभागप्रमुख पांडुरंग वाघ, विभागप्रमुख डॉ बाळासाहेब भोसले, उपविभाग प्रमुख दत्ता कदम,भिगवण शहरप्रमुख रामचंद्र पांचगणे,युवासेना तालुका समन्वय नवनाथ सुतार व शिवसैनिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here