इंदापूर तालुक्यातील नामांकित व्यक्तिमत्व तथा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळदास भाई शहा यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांची वय 87 होते. गेल्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे ही निधन झाल्यामुळे शहाकुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. गोकुळदास भाई शहा यांचा जन्म १० ऑगस्ट १९३६ रोजी झाला. तेव्हापासून त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले.तालुक््यातील अनेक महत्वपूर्ण बाबींचे ते साक्षीदार ठरले.इंदापूर तालुक्याच्या राजकारणात तत्कालिन खासदार स्वर्गीय शंकररावजी पाटील यांचे ते खांदे समर्थक होते. भाऊ आणि भाई या जोडीने १९८४ साली इंदापूर तालुक्यातील बिजवडीच्या माळावर वालचंदनगर येथील साखर कारखाना विकत घेऊन त्याचे सहकारात पुनर्ररोपन केले. या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या योगदानामुळे हा वटवृक्ष कायम बहरत गेला. यातुनचं तालुक्याला वैभवप्राप्ती झाली. शेतकरी वर्गाचे अर्थाजन झाल्याने भाऊ आणि भाईंची जोडी ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून नावारूपाला आली.
गोकुळदास भाई शहा यांचे इंदापूरच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असून इंदापूर तालुक्यात शिक्षणाची क्रांती घडवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. कर्मयोगी कारखान्याचे ते संस्थापक उपाध्यक्ष राहिलेले असून इंदापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच मेन पेठेला शहा ब्रदर्स नावाने कापड व्यवसायही ते चालवत होते.इंदापूर मध्ये अनेक गरजू व्यक्तींना त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सहाय्य करत होते त्यामुळे इंदापूर शहरात त्यांना एक मानाचे स्थान होते इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शेठ शहा यांचे ते वडील होते तर इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन भरत शेठ शहा यांचे ते चुलते होते. इंदापूर तालुक्याचे नाव भारताच्या नकाशात कोरण्याचे काम करणाऱ्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांचे ते सासरे होते.गोकुळ शेठ शहा यांच्या जाण्याने इंदापूर शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात दुःख व्यक्त केली जात आहे.त्यांनी केलेलं गोरगरिबांसाठी शैक्षणिक कार्य इंदापूर तालुका कधीही विसरणार नाही.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यात शिक्षणाची क्रांती घडवणारे तथा प्रसिद्ध कापड व्यापारी गोकुळशेठ शहा यांचे...