इंदापूर टोलनाकाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा अंतर्गत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न.

इंदापूर: हायवेवरील टोल नाका म्हटलं की काहीतरी वादाचा विषय असं काहीसं समीकरण समाज माध्यमात सध्या आहे. परंतु याच टोलनाक्यावरील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे.आज दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी भारतीय राजमार्ग प्राधिकरण वरील पुणे सोलापूर एक्सप्रेस हायवे प्रायव्हेट लिमिटेड सरडेवाडी या ठिकाणी स्वच्छता पंधरावडा यानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये टोल नाका व टोलनाक्याच्या आजूबाजूला असलेला परिसर सुद्धा स्वच्छ करण्यात आला.या शिबिरात हायवे वरून जाणाऱ्या वाहक चालक आणि प्रवाशांसाठी त्याचप्रमाणे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांसाठी हे शिबिर लाभदायक ठरले.इंदापूर सिटी केअर सेंटर यांच्या साह्याने सर्वांसाठी डोळे तपासणी, बॉडी चेकअप, ईसीजी, शुगर चेकअप बीपी इत्यादी अगदी मोफत करण्यात आल्या. टोल नाक्यावरील कर्मचारी वाहक चालक आणि प्रवाशी यांनी या शिबिरास उत्तम प्रकारे प्रतिसाद देत शेकडो लाभार्थ्यांनी लाभ घेतला.हे शिबिर यशस्वी होण्याकरिता भगतसिंग राठोड, डॉ समीर मगर, डॉ नेताजी कसबे, टोलनाका व्यवस्थापक सतीश चव्हाण, रामचंद्र जाधव, ओंमकार पनारी, त्याचप्रमाणे टोलनाक्यावरील कर्मचारी बांधवांनी परिश्रम घेतले. या केलेल्या शिबिराबद्दल पंचक्रोशी मध्ये कौतुक करण्यात येत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here