इंदापुर:(प्रतिनिधी:संतोष तावरे)अवसरीमध्ये कालपासून अखंड हरिनाम सप्ताहला आनंदमयी वातावरणात सुरुवात झाली आहे .मागील दोन ते तीन वर्षापासून कोरोनामुळे हा सप्ताह व यात्रा होऊ शकली नव्हती. परंतु आत्ता कोरोना आटोक्यात आल्यामुळे सगळीकडेच सप्ताह यात्रा व इतर सण मोठ्या आनंदाने साजरी करत आहेत. अवसरी मध्ये अखंड हरिनाम सप्ताह यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह .भ .प तुकाराम महाराज काळकुटे.( रेडणी), सुनील महाराज जगताप अवसरी, केशव महाराज तोडकर सुरवड, संतोष महाराज मगर भाटनिमगाव ,दत्ता महाराज गलांडे लासुरणे, हनुमंत महाराज मारकड कात्रज, रामहरी महाराज तरंगे बळपुडी, अनिरुद्ध महाराज निंबाळकर बिटरगाव, ज्ञानेश्वर महाराज शिंदे ,यांचे कीर्तने होणार असून संत श्रवणाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी घ्यावा असे आवाहन अवसरी ग्रामस्थांनी केले आहे. तसेच 21 तारखेला हनुमान देवाची यात्रा होणार असून यात्रेची तयारी जोरदार चालू आहे सर्व मंदिरे विद्युत रोषणाईने झळकत आहेत मंत्रमुग्ध करणारी ही रोषणाई डोळ्याचे पारणे फेडत आहे. यात्रेदिवशी संध्याकाळी सात वाजता छबिन्याला सुरुवात होणार असून छबिन्या नंतर तमाशा रसिक प्रेक्षकांसाठी दत्ता महाडिक पुणेकर यांचा सुप्रसिद्ध तमाशा रसिक प्रेमी साठी ठेवला आहे .तरी अखंड हरिनाम सप्ताह साठी व यात्रेसाठी पंचक्रोशीतील भक्तांनी रसिक प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना अवसरी गावचे युवा सरपंच श्री संदेश शिंदे व अवसरी मधील ग्रामस्थ यांनी सांगितले.