व्वा..मामा..!आमदार दत्तामामा भरणे यांनी दिलेला शब्द पाळला..ग्रामदैवत श्री इंद्रेश्वरदेव रथासाठी भरणे कुटुंबीयांकडून तब्बल 5 लाख रुपये रोख देणगी.

आमदार दत्तात्रय भरणे हे नेहमीच आपला वेगळेपणा आणि विश्वासार्हता जपण्याचा प्रयत्न करत असतात. इंदापूर तालुक्यात अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यामधून आमदार दत्तात्रय भरणे यांची विश्वासार्हता आणि दिलेला शब्द पाळला गेले आहे असे दिसून येते त्यापैकीच आणखी एक उदाहरण समोर आले आहे.आमदार दत्तात्रय भरणे हे गेल्या वर्षापूर्वी ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवाच्या यात्रेत आले असता आमदार भरणे यांनी आपण या देवस्थान ट्रस्टला यात्रेसाठी लागणारा महत्त्वाचा जो रथ असतो त्यासाठी भरणे कुटुंबीयांकडून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. सध्या या देवस्थानच्या ट्रस्टकडून यात्रेतील लागणाऱ्या या महत्वाच्या रथ बनवण्याचे नियोजन चालू केले आहे हे आमदार भरणे यांना समजतात त्यांनी काल इंदापूर येथील एका कार्यक्रमात आल्यानंतर सर्व महत्त्वाच्या विश्वस्तांना बोलवून या कामाची चौकशी केली व त्वरित पाच लाख रुपये रोख स्वरूपात विश्वस्थ संदीप वाशिंबेकर यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी संदीप वाशिंबेकर, धीरज शहा, रुपेश सोनी, भावेश ओसवाल, पत्रकार राहुल ढवळे,गोरख पवार,श्रीकांत गुरव,सागर भागवत,चेतन जाधव इत्यादी उपस्थित होते.
  असा असेल हा रथ:
हा रथ संपूर्णपणे सागवानी लाकडाचा असून हा कर्नाटकातील दांडेली या अभयारण्यातून आणला जाणार आहे. या रथास एकही खिळा मारला जाणार नसून एका विशिष्ट पद्धतीने हा रथ जमिनीपासून सुमारे 17 फूट उंच बनवला जाणार आहे.लाल रंगाच्या सागवानी लाकडाचा यात वापर होणार असून तब्बल 120 घन फुट लाकूड म्हणजेच जवळपास दोन टन सागवान यास वापरले जाणार आहे. या लाकडाची शंभर वर्ष गॅरंटी असणार आहे. या रथास साधारणपणे 12 ते 15 लाख रुपये खर्च होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रथास बनवण्यासाठी कोकणातील 5 प्रसिद्ध नक्षीकाम करणारे कारागीर अहोरात्र तीन महिने काम करून हा रथ रेखीव पद्धतीने अप्रतिम स्वरूपाचा बनवणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here