इंदापूर:दि १६ शिक्षक समिती इंदापूर शाखेच्यावतीने निमगाव केतकी परिसरातील इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेले ११ मुले , झी 24 तास मराठी न्युज चॕनलची अधिस्वीकृती मिळलेले रिपोर्टर जावेद मुलाणी , डाॕ श्वेता धारूकर यांचा निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर येथे फेटा , पुष्पहार , पेन , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल , नृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे , रिपोर्टर तथा पञकार जावेद मुलाणी , डाॕ श्वेता धारूरकर , ओंकार शेंडे यांनी मनोगते व्यक्त केली. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे सोहम राऊत , श्रेयशी भोंग , अर्णव भोंग , आर्या शेंडे , ओंकार शेंडे , वरद काळेल , यश पांढरे , प्रतिक पांढरे , राघव लाळगे , तृप्ती शेंडे , वेदांत गुधाटे , जिल्हा पातळीवर निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेली आराध्या वडापुरे त्याचप्रमाणे रिपोर्टर जावेद मुलाणी , बीएएमएस पदवी संपादन केलेली डाॕ श्वेता धारूरकर यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत फलफले , माजी अध्यक्ष विलास शिंदे , ज्ञानदेव चव्हाण , सुनिल शिंदे , संचालक सुनिल चव्हाण , शिक्षक भारतीचे सतिश शिंदे , लतिफ तांबोळी , अरूण मिरगणे , शशीकांत शेंडे , शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे , भुषण जौंजाळ , अजिनाथ आदलिंग , सुरेश धारूरकर , किरण लंगोटे , बाळासाहेब अभंग , सुनिल पवार , योगेश पांढरे , गणेश लाळगे , सतिश भोंग , राजेंद्र काळेल , दिलीप राऊत , राजेंद्र भोंग , महिला आघाडी प्रमुख रत्नमाला भोंग , शिक्षक , पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष किरण म्हेञे यांनी केले.सुञसंचालन संतोष हेगडे यांनी केले व आभार शिक्षक समितीच्या महिला आघाडी प्रमुख सुरेखा अभंग यांनी मानले.