निमगाव केतकी:नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. अगदी या म्हणी प्रमाणेच तुषार (बाबा) जाधव यांनी स्वकर्तृत्व सिद्ध करून युवकांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.कमी वयातच यशाची उच्च शिखरे गाठणारी अनेक उदाहरणे समाजात आहेत.अशाच एका इंदापूर तालुक्याच्या नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असणाऱ्या निमगाव केतकी गावातील ध्येयवेड्या युवकाची अल्पशी माहिती त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आपणां समोर मांडत आहे.राजकीय वारसा, घरची परिस्थिती ही खंबीर परंतू,स्वकर्तुत्वावर आपले विश्व निर्माण करण्याचा ध्यास मनाशी बाळगून आपल्या सारख्या असंख्य युवा वर्गाला प्रोत्साहन देत त्यांच्यासाठी व्यवसायांची अनेक कवाडे उघडणारा एका ध्येय वेडा युवक तुषार (बाबा) जाधव…..आज तुषार (बाबा) जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत आहे. न्यु इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराने याची सुरवात होणार असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास स्मार्ट वॉच किंवा ब्लूटूथ हेडफोन (बर्ड्स) देण्यात येणार आहेत. महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.० ते ५ वयोगट असणाऱ्या बालकांसाठी मोफत आधार कार्ड काढून देण्यात येणार असून आधार अपडेट कॅम्प देखील लावण्यात येणार आहे.मुठभर मावळे सोबतीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक कठीण प्रसंगाला तोंड देत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सर्वसामान्य लेकरांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य खर्च केले.त्यांचीच प्रेरणा घेत गरिब कुटुंबातील युवक हा व्यवसायाभिमुख बनून तो स्वतःच्या पायावरती उभा राहून आपल्या कुटुंबाला, तसेच गावाच्या विकासाला कसे योगदान देईल या प्रेरणेने प्रेरित होऊन सर्वसामान्याच्या मदतीसाठी उभा राहत निमगाव केतकी व पंचक्रोशीतील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.तुषार (बाबा) जाधव यांचा याचा जन्म १६ जुन १९८७ साली झाला.आई सुनंदा व वडील देवराज जाधव यांनी हालाखीचे जीवन जगत गवंड्याच्या हाताखाली काम केले.गवंड्याच्या हाताखाली लेबर म्हणून काम करण्यापासून ते प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिका पर्यत त्यांनी मजल मारली.गावच्या राजकारणात एकहाती सत्ता मिळवत पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यावरही कब्जा मिळवला. तुषार (बाबा) जाधव याचे शालेय शिक्षण निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालय येथे पूर्ण झाले.पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे बिल्डिंग डिझाईनींगचे शिक्षण पुर्ण केले. तुषारने व्यवसायिक शिक्षण संपल्यानंतर वडीलांच्या बांधकाम व्यवसायात मदत करत पारंपारिक व्यवसायास आधुनिकतेची जोड द्यायला सुरुवात केली. नवनवीन बांधकाम डिझायनिंग ,त्याला लागणारे कच्चे मटेरियल निर्मितीचा मोठा व्यवसाय उभा केला. वाळुला पर्याय असणारा स्टोन क्रश सँड, पेवर ब्लॉक, सिमेंट, वीट असे बांधकाम व्यवसायाशी निगडीत प्रोजेक्ट उभारुन यशस्वी निर्मिती केली. लँड डेव्हल्पमेंट सारखे प्रयोग यशस्वी पणे चालवले.सतत नवनिर्मितीचा ध्यास आपल्या मनाशी बाळगत प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत बदलत्या परिस्थितीत व्यवसायात बदल करुन त्या दृष्टीने आपल्या वडीलांच्या नावे इंदापुरच्या एम.आय.डी.सी मध्ये देवराज फुड प्रॉडक्ट प्रा.लि. कंपनीची उभारणी करून शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा या हेतूने देवराज दूध डेअरी ची स्थापना करत शेतकऱ्यांच्या दूधाला जास्तीत जास्त दर कसा मिळेल याकडेही त्यांनी लक्ष दिले. आपल्या कार्यकुशलतेतून सिद्धीविनायक पतसंस्था स्थापन करुन होतकरु तरुण युवकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी लघु उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य केले. समाजात नावारुपाला आलेले युवा नेतृत्व म्हणून निमगाव केतकी येथील २५००० लोकसंख्या असणाऱ्या गावचे उपसरपंच पद भूषवत ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील अनेक विकास कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली.ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण वर्गाला तुषार (बाबा) जाधव यांच्या रूपाने आधुनिक युवा आयडाॅल मिळत आहे. आज त्यांचा वाढदिवस या निमित्ताने येणाऱ्या काळात त्यांची अशीच भरभराट होत राहो हीच सदिच्छा आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….