नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या संकल्पनेतून “कोरोना व्हायरस पासून घेऊ खबरदारी, पर्यावरणपुरक विसर्जन रथ आपल्या दारी”

कोरोना व्हायरस पासून घेऊ खबरदारी, पर्यावरणपुरक विसर्जन रथ आपल्या दारी..
इंदापूर: उद्या रविवार दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी श्री गणेश विसर्जन असल्याने श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांची घराबाहेर पडून गर्दी होऊ नये अथवा कोरोना व्हायरस सारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इंदापूर शहरातील नागरीकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष माननीय अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी माननीय श्री रामराजे कापरे यांच्या संकल्पनेतून श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी संपूर्ण इंदापूर शहरामध्ये इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने चार पर्यावरणपूरक असे विसर्जनरथ (वाहन) व पूजा विधी केलेले निर्माल्य टाकण्यासाठी वेगळे असे चार वाहन तयार ठेवले असून सदर दोन्ही वाहने गल्लोगल्ली, दारोदारी संपूर्ण शहरांमध्ये नागरिकांच्या घरांमधील श्री गणेशाचे मूर्ती विसर्जन करण्याकरता घेणार असून सदर प्रत्येक विसर्जन रथा बरोबर नगरपरिषदेच्या चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे . नागरिकांनी श्री गणेशाचे विसर्जन करण्याकरिता घराबाहेर न पडता आपल्या घरातील श्री गणेशाची मूर्ती सदर रथामध्ये विसर्जन करण्याकरता द्यावी व वेगळे केलेले पूजा विधीचे निर्माल्य जसे फुल हार दुर्वा व इतर साहित्य वेगळे ठेवून विसर्जनरथा सोबत असलेल्या वाहनांमध्ये द्यावे. नागरिकांना इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात येते की आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी प्रत्येकाने जबाबदारीने उद्या रविवार दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोणीही घराबाहेर न पडता आपल्या घरातील मूर्ती इंदापूर नगर परिषदेने तयार केलेल्या पर्यावरण पूरक विसर्जन रथामध्ये द्यावी. गर्दी टाळावी गर्दी करू नये आणि कोरोनाव्हायरस सारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका टाळावा व घरीच थांबून सुरक्षित राहावे. सदर श्री गणेशाची मूर्ती विसर्जन करण्याकरता देताना गर्दी करू नये, तोंडावर मास्कचा वापर करावा.सदर विसर्जन रथा चे नियोजन करण्याकरिता नियंत्रक म्हणून श्री विलास चव्हाण,श्री अल्ताफ पठाण,श्री लिलाचंद पोळ,श्री अशोक चिंचकर,श्री सुनील लोहिरे व श्री दिपक शिंदे यांची नेमणूक केलेली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here