दबंग अभिनेता सलमान खान याला वाढदिवसाच्या दिवशी झाला सर्पदंश.वाचा याबाबत सविस्तर वृत्त.

पनवेल: बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खाना सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान खान हा त्याच्या पनवेलमधीलमधील फार्महाऊसमध्ये असताना त्याला सर्पदंश झाला. दरम्यान, सलमानला साप चावल्यानंतर त्याला पहाटे ३.३० वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांनंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सलमान खानचे पनवेलमधील वाजेपूर येथे अर्पिता फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर सलमान विश्रांतीसाठी तसेच मित्रमंडळींसोबत येत असतो. दरम्यान, काल याच फार्महाऊसमध्ये सलमानला सर्पदंश झाला. त्यानंतर तातडीने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती उत्तम असल्याने त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले.
सलमान खान शनिवारी संध्याकाळी पनवेलमधील फार्महाऊसवर आला होता. मिळत असलेल्या माहितीनुसार सलमान खानला चावलेला साप हा बिनविषारी होता. त्यामुळे सलमानच्या प्रकृतीवर त्याचा फारसा विपरित परिणाम झालेला नाही.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here