इंदापूरच्या ग्रामीण भागातील हनुमान विद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची विश्वविक्रमाकडे वाटचाल.

👉 डॉ.एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च वेहिकल मिशन 2023 साठी निवड.
इंदापूर:(उपसंपादक: संतोष तावरे)डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल मिशन 2023 साठी इंदापूर तालुक्यातील लोकसेवक गणपतराव आवटे सॅटेलाइट टीम तयार करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून विज्ञान विषयाची मुलांमध्ये जागृती व्हावे हा उद्देश ठेवून उपक्रम राबवण्यात आला आहे. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलम स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेहिकल मिशन 2023 आयोजित करण्यात आले आहे. अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या मिशनसाठी निवड झालेल्या अवसरी येथील श्री हनुमान विद्यालय अवसरी येथील विद्यार्थ्यांचे विश्वविक्रमाकडे वाटचाल सुरू झाल्याचे बोलले जाते. चैतन्य झगडे, प्रज्ञा बाबर, समृद्धी मोरे,पुनम कवितके, रोहन कवितके, महादेवी गुरव, सुस्मीत बोराटे, शहीद शेख, आरती पोळ, श्रद्धा पवार अशी विद्यार्थ्यांची व शिक्षक नाना घळके, प्रवीण लोढे यांची नावे आहेत. इंदापूर तालुक्यातून या दहा विद्यार्थ्यांची निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. उपग्रह बनवण्यासाठी पुणे, नागपूर आणि परभणी येथे विद्यार्थ्यांची कार्यशाळा लवकरच आयोजित केली जाणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन मेरिटमध्ये येणाऱ्या 100 विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनवणार आहेत. यासाठी एकेआयएफ राज्य समन्वयक मनिषा ताई चौधरी जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी कोकण विभागप्रमुख संदिप वरगे यांचे योगदान मोलाचे आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणाऱ्या प्रकल्पात इंदापूर येथील विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप देऊन सहभाग करून घेतला आहे. अशी माहिती आवटे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर आवटे यांनी दिली..सदर प्रकल्प हा विश्वविक्रम म्हणून नोंदविला जाणार आहे.पुणे जिल्ह्यातून एकाच विद्यालयाचे तेही ग्रामीण भागातील दहा विद्यार्थी निवडले जाणे हे अत्यंत गौरवास्पद आहे. या निवडीबद्दल सर्व विद्यार्थ्यी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष श्री.अरूणदादा शिंगटे, सचिव सौ. विजया शिंगटे मॅडम व मुख्याध्यापक श्री. प्रविण लोंढे (सर) यांनी विशेष अभिनंदन केले . अवसरी,बेडशिंगे,व भाटनिमगांव या सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here