इंदापूर: इंदापूर भिशी घोटाळ्यातील गुन्हा दाखल झालेल्या आरोपींपैकी सात जणांनी अटकपूर्व जामिनीसाठी इंदापूर न्यायालयात 2 अर्ज व जिल्हा व सत्र न्यायालय बारामती येथे 5 अर्ज असे एकूण 7 अर्ज दाखल केले होते. सात ही जणांचे अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. इंदापुरातील भिशी फसवणुकीमधील 16 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. भिशी प्रकरणात गुन्हे दाखल करताना शिवसेनेचे शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी सर्व फसवणूक झालेल्या लोकांना एकत्रित करून व वेळोवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत भिसीत फसवणूक झालेल्या लोकांना न्याय मिळवण्याच्या हेतूने गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामधील 2 आरोपींनी अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी इंदापूर कोर्ट व 5 आरोपींनी बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल केले होते. दोन्ही न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केले आहेत.उषाप्पा मारुती बंडगर,उत्तम मारुती बंडगर ,गोविंद रामदास जाधव ,राजु वसंत शेवाळे, अजय शिवाजी शेवाळे, सचिन लक्ष्मण कुंभार, प्रशांत सुरेश कुभांर (सर्व राहणार- इंदापूर ,जिल्हा- पुणे ) यांनी अटक पुर्व जामिनीसाठी अर्ज केले होते. ते न्यायालयाने नामंजूर केले आहेत.यातील काशीनाथ एकनाथ म्हेत्रे व संतोष बाबूराव झिंगाडे हे दोन आरोपी अटकेत असून सध्या येरवडा कारागृहात आहेत. इतर आरोपी फरार आहेत. सरकारी वकिल म्हणून ॲड कमलाकांत नवले यांनी व ॲड पी. टी. गांधी यांनी कामकाज पाहिले.