अवधूत पाटील : उपसंपादक,जनता एक्सप्रेस मराठी न्यूज
इंदापूर || इंदापूर तालुका शिक्षक सह.पतसंस्थेच्या सन 2021 22 या वर्षाकरीता चेअरमनपदी वसंत किसन फलफले यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि.07 आक्टोबर रोजी इंदापूर तालुका शिक्षक सह.पतसंस्थेच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते त्यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
इंदापूर तालुका शिक्षक सह.पतसंस्थेचे विद्यामान चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांनी आपल्या पदाचा स्वच्छेने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी गुरूवारी चेअरमन निवड प्रक्रिया पार पडली. वसंत फलफले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने व तो अर्ज पात्र ठरल्याने पिठासन अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बाळासाहेब बंडगर यांनी वसंत फलफले यांची नूतन चेअरमन म्हणून घोषणा केली. या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चेअरमन वसंत फलफले यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
“मिळालेल्या संधीचं सोन करेन”- चेअरमन वसंत फलफले
या निवडीनंतर नुतन चेअरमन वसंत फलफले म्हणाले की, घटनेस्थापनेच्या दिवशी माझी चेअरमन पदी माझी निवड झाली. जी खुर्ची मला दिली आहे त्याचा खुर्चीचा सर्व सभासदांच्या हितासाठी वापर केला जाईल.पतसंस्थेने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कडून घेतलेले कर्ज सभासदाच्या मुदत ठेवीच्या रुपाने संस्था स्वभांडवली निवडणूकीच्या अगोदर करण्याचा निर्णय केला जाईल.सर्व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन पारदर्शक कारभार केला जाईल व मिळालेल्या संधीचं सोन करेन..
वसंत फलफले यांसारखे होतकरु व्यक्तिमत्त्व -किरण म्हेत्रे
यावेळी किरण म्हेत्रे म्हणाले की,वसंत फलफले यांसारखा शांत-संयमी व्यक्तीमत्व असणारा व्यक्ती संस्थेच्या चेअरमन पदी विराजमान होत आहे याचा संचालक मंडळासाह सर्व सदस्यांना मनापासून आनंद हलत आहे.खर्या अर्थाने शिक्षक पथसंस्थेत शिक्षक समितीची सत्ता आल्यापासून या संस्थेच्या कामकाज सुधारले आहे.जी पतसंस्था सभासदांना दीड लाख रुपये कर्ज देत होती ती आता एका सभासद शिक्षकाला केवळ ९ टक्के व्याजदराने २० लाख रूपये कर्ज देते.राज्यात एवढ्या कमी दराने अन्य कोणतीही संस्था कर्ज देत नाही.या संस्थेच्या एकवेकर जागेत कार्यालय,व्यापारी संकूल,संस्थेची इमारत असून फार मोठी उलाढाल सर्व सभसदांना विचारात घेऊन केली जात असल्याने या संचालक मंडळावर सभासंदानी मोठा विश्वास दाखवला आहे.गेल्या पंधरा वर्षापासून सर्वांना सोबत घेऊन चांगला कारभार शिक्षक समिती करत आहे.२०२१/२२ या वर्षाकरिता वसंत फलफले यांसारखे होतकरु व्यक्तिमत्त्व या संस्थेस चेअरमन पदी लाभल्याने नक्कीच आणखी चांगले काम होईल. संपूर्ण पॅनल कसा ताकदीने निवडणून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा…
इतिहास घडवणारे फलफले सर- अनिल रुपनवर
आज या संस्थेच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ही दोन्ही पदे एकाच माणसाकडे आहेत. प्रत्येक शिक्षकाच्या जिव्हाळ्याचा विषय ते योग्य पणे हाताळतात. जो या संस्थेचा उपसभापतीची होतो तो चेअरमन कधीच होत नाही हा इतिहास देखिल फलफले यांनी पुसून काढला आहे.आगणी निवडणूकात आपला संपूर्ण पॅनल कसा ताकदीने निवडणून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन अनिल रुपनवर यांनी केले.
मला भरभरून प्रेम मिळाले-मा.चेअरमन ज्ञानदेव चव्हाण
मनात नसताना मला समितीने चेअरमन पद दिले…. मागील काळात समितीने मला भरभरुन दिले. मनात नसताना मला समितीने चेअरमन पद दिले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो मुळशी मध्ये कार्यरत असताना मला इंदापूर मध्ये माझ्यावर विश्वास दाखवला. एवढेच नव्हे तर पी.डी.सी.चा संचालक निवडण्याचा अधिकार देखील मला दिला. त्यामुळे मी कायम समितीचा ऋणी राहील असे प्रतिपादन मावळते चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांनी यावेळी केले.
या संस्थेची अशीच भरभराट होवो-गटनेते कैलास कदम
गटनेते कैलास कदम म्हणाले की, फलफले यांना बरेच जन चिडवायचे की तुमचा कधी नंबर लागतोय मात्र आज त्यांचे स्वप्न सत्त्यात उतरले आहे. कोरोनाच्या काळात निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. मात्र दोन तीन महिन्यात त्या कदाचित पार पडतील. ही संस्था प्रत्येकाला २० लाखाचे कर्ज ते ही अल्पदराने देते. कोरोनाच्या काळात मृत्यू पावलेल्या कुटुंबालाही सोळा लाखाचा निधी आपण मदत म्हणून दिला होता.या संस्था अशीच भविष्यात भरभराट होत रहावो.
विरोधकांना गाळ्यांबाबत बोलण्याचा अधिकार नाही-अध्यक्ष ज्ञानदेव बागल
२०१५ मध्ये निवडणूक झाली तेव्हा आपण १२ लाख कर्ज मर्यादा करु असा शब्द दिला होता. आज २० लाख रुपये आपण कर्ज मर्यादा केली आहे. २००६ पासून संस्थेची खरी प्रगती झाली. १९६२ सालापासून संस्थेच्या या जागेत एका संस्थेच्या इमारतीशिवाय काही नव्हते. राज्यात पहिल्यांदा या संस्थेवर १९९५ साली प्रशासक नेमण्याची वेळ आली.मात्र २००६ सालापासून शिक्षक समितीची सत्ता आल्यानंतर आपण ही प्रगती पाहतो आहोत. विरोधकांना गाळ्यांबाबत बोलण्याचा अधिकार नाही असे मत समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की विरोधकांच्या अडमुठ्या धोरणामुळे गाळा निलावातून करोडो रूपयाचे संस्थेने नुकसान झाले.विरोधकांनी संस्था ताब्यात असताना स्वतःला स्वतःची लाज वाटेल तिथे देखील पैसे खाल्ले. शिक्षक समितीने कारभार पारदर्शक केला आहे.त्यामुळे विरोधकांच्या टीकेला सभासद भिक घालणार नाहीत.२००६ पासून या संस्थेला विश्वासाची परंपरा लाभली आहे.आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखली संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.त्यामुळे विरोधकांनी खोटे बोल पण रेटून बोल ची पध्दत बदलावी.आगामी निवडणूकात विरोधकांना मागील १५ वर्षाच्या कालखंडाची उत्तरे द्यायला तयार आहे.विरोधकांनी देखील आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
या निवडी प्रसंगी मावळते चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांनी उत्कृष्टरीत्या कामकाज केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक किरण म्हेत्रे यांनी केले तर आभार सचिव संजय लोहार यांनी मानले.
प्रसंगी युवा नेते दिपक जाधव ,पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम , पतसंस्थेचे माजी चेअरमन व संचालक ज्ञानदेव बागल , हरिश काळेल , सुनिल वाघ , विलास शिंदे , संभाजी काळे , किरण म्हेञे , नितिन वाघमोडे , सुनंदा बोके , हनुमंत दराडे , सुभाष भिटे , सुनिल चव्हाण , गणेश सोलनकर, सचिव संजय लोहार , भालचंद्र भोसले उपस्थित होते.
नुतन चेअरमन वसंत फलफले यांचा तालुक्यातील विविध भागातून आलेल्या शिक्षक , नातेवाईक , सामाजिक संघटना यांचे वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी गटनेते कैलास कदम , अनिल रूपनवर , ज्ञानदेव चव्हाण , वसंत फलफले , ज्ञानदेव बागल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनिल शिंदे , छगन मुलाणी , संदिपान लावंड , विलास पानसरे , अरूण मिरगणे , सुनिल कोकाटे , नजीर शिकीलकर , भारत ननवरे , विनय मखरे , सुरेश माने , लतिफ तांबोळी , विकास भोसले , योगेश पांढरे , आत्माराम मारकड , भुषण जौंजाळ , मैनुद्दीन मोमीन , सतिश खटके , सर्जेराव खुसपे , भारत गायकवाड , राहुल लंबाते , अमोल बोराटे , प्रविण ढुके , बापूराव राऊत , शिवाजी जाधव , किरण घाडगे , नितिन रणसिंग , सागर रणसिंग , जावेद मुलाणी , महेश नवले , राहुल कानगुडे , संतोष घोडके , योगीराज गाडेकर , तानाजी मदने , विकास वाघ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन माजी चेअरमन व संचालक किरण म्हेञे यांनी केले.आभार जुनी पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मानले.