इंदापूर: ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर यांना रोटरी क्लब च्या माध्यमातून शेटफळ हवेली येथील गारपीर मंदिर येथे तीन सिमेंटचे बेंच नुकतेच दिले गेले.शेटफळ हवेली येथील गारपीर मंदिर हे सर्व धर्म समानतेचे प्रतीक मानले जाते या मंदिरावर सर्वच जाती धर्मातील बांधव दर्शनासाठी येत असतात परंतु त्यांना बसण्यासाठी तिथे काही सुविधा नसल्याने विशेषता गावातील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर यांच्या वतीने हनुमंत शिंदे यांनी रोटरी क्लब इंदापूर चे अध्यक्ष श्री उदय शहा यांच्याकडे 3 सिमेंटच्या बेंच ची मागणी केली. क्षणाचाही विलंब न करता रोटरीचे अध्यक्ष उदय शहा यांनी त्वरित या मंदिर परिसरात तीन बेंच दिले व हे बेंच गेल्या आठवड्यामध्ये बसवण्यात आले.यावेळी सुर्यकांत चव्हाण, निवृत्ती सावंत ,बाळासाहेब नलवडे,कैलास चव्हाण व इतर नागरिक उपस्थित होते.
हनुमंत शिंदे यांनी रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा यांचे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने आभार मानले व इंदापूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिक संघसाठी जो-जो लाभ देता येईल त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे हनुमंत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.