उपसंपादक: संतोष तावरे
इंदापूर: भांडगाव-अवसरी व अवसरी-वडापुरी या रस्त्यावर महावितरण कंपनीची वीज वाहक तार ऊस वाहतूकदारांची डोकेदुखी ठरत आहे .भांडगाव कडून अवसरी मार्गे कर्मयोगी कारखाना व निरा भिमा कारखाना या कारखान्याकरिता ऊस वाहतूक होत असते, परंतु भांडगाव अवसरी या रस्त्यावर सचिन मोहन गायकवाड यांच्या घरानजीक महावितरण कंपनीच्या विद्युत तारा रस्ता क्रॉस करून पुढे गेल्या आहेत .त्या तारा ऊस वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. तारा खालून ऊस वाहतूक करायची म्हटलं तर ऊस वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्या तारांची उंचीही कमी आहे आणि प्रत्येक उसाच्या खेपेला त्यात तारेखाली ट्रॉली मधील ऊस अडकत आहे.त्यामुळे विद्युत पार्किंगही तिथे रोज होत आहे. परवा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर त्या तारे खालून जात असताना विद्युत पार्किंग मोठ्या प्रमाणावर झाली त्यामध्ये भांडगाव चे मा .सरपंच अंकुश गायकवाड यांचे एक एकर मधील ऊस पाचट जळून खाक झाले. त्यांचा काही दिवस अगोदर त्या शेतातील ऊस कारखान्याकडे गळीतासाठी गेला होता त्यामुळे त्यांचे होणारे मोठे नुकसान टळले. परंतु पेटलेल्या पाचटाच्या लगत शेकडो एकर ऊस उभा होता तो पेटला असता तर किती मोठे अग्नी तांडव झाले असते याची कल्पनाही आपण करू शकत नाही. ते ही अग्नी तांडव झालेच असते परंतु पाचट पेटल्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर तिथे लोक उपस्थित होते त्यामुळे पुढचा होणारा अग्नि-तांडवाचा अनर्थ टळला .सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले की ,आम्ही वारंवार वायरमनला या विद्युत तारा विषयी कल्पना दिली होती. तारा उंचीवर घ्या असे सांगितलेही आहे. परंतु त्याची दखल आजपर्यंत तरी घेतली नाही. मग महावितरण कंपनी नक्की दखल कधी घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय .आणि तीच परिस्थिती अवसरी वडापुरी रस्त्यावरही आहे .अवसरी मधील निराभिमासाठी ऊस वाहतूक अवसरी वडापुरी मार्गे निरा भिमा कारखान्याला होत असते परंतु अवसरी प्राथमिक शाळेजवळ अशाच विद्युत तारा खाली आल्यामुळे त्याची उंची कमी असल्यामुळे तिथेही ऊस वाहतूक दारांची डोकेदुखी वाढत आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येक वेळी बांबूने त्या तारा खालून वरती उचलाव्या लागत आहेत तेव्हाच ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर त्या तारे खालून जात आहे. परंतु बांबूने ज्यावेळेस त्या तारा खालून उचलल्या जातात तेव्हा त्या तारेमध्ये विद्युत सप्लाय चालू असतो. ती तार खालून बांबूनी उचल त्यावेळी जर पार्किंग झाले तर काय होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. महावितरण कंपनी कोणाचा जीव जावा याचीच वाट पाहते काय, किंवा मोठे उसाचे अग्नित्तांडव व्हावे याची वाट पाहते काय असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडत आहे. तातडीने भांडगाव अवसरी व अवसरी वडापुरी या रस्त्यावरची विद्युत तारांची उंची वाढवणे गरजेचे आहे. महावितरण ने तात्काळ त्याची उंची वाढवावी अशी मागणी ऊस वाहतूकदार व शेतकरी वर्ग करत आहेत.
Home Uncategorized भांडगाव-अवसरी व अवसरी-वडापुरी या रस्त्यावर महावितरणाची वीज वाहक तार ठरत आहे ऊस...