इंदापूर, बेडशिंगे ,अवसरी ,भांडगाव रस्त्याचा खेळखंडोबा, रस्त्यावरची अत्यावश्यक वाहतूक अनेक दिवसांपासून ठप्प-.इंदापूर तालुक्यातील, बेडशिंगे ,अवसरी, भांडगाव ,भाटनिंमगाव या गावाची अत्यावश्यक वाहतूक गेली अनेक दिवसापासून ठप्प झाली आहे. पुणे सोलापूर हवे बायपास लगत असणारा हा रस्ता गेली अनेक दिवसापासून खोदाईमुळे बंद आहे. त्यामुळे अत्यावश्यक समजली जाणारी लाल परी गेली अनेक दिवसापासून बंद आहे .ऊस कारखान्यांचाही गळीत हंगाम चालू झाला असून ऊस वाहतुकीसाठी ही खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे.याबाबत अवसरी, बेडशिंगे ,भाटनिमगाव, बाभूळगाव मधील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी मागील वीस दिवसात बांधकाम विभागाला रस्ता चालू करण्याबद्दल तसे निवेदन ही दिले होते, परंतु आणखीनही कोणीच त्या रस्त्याची दखल घेतल्याचे दिसून येत नाही .रस्ता आजही बंदच आहे .इंदापूरचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे असे इंदापूरचे तहसीलदार श्री. श्रीकांत पाटील यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती ग्रामस्थांमधून होत आहे. या रस्त्याची जड वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे ऊस वाहतूक अवसरी वडापुरी मार्गे सध्या जीव मुठीत धरून चालू आहे .कारण वडापुरी अवसरी रस्त्याच्या कामालाही आणखीन मुहूर्त मिळालेला नाही. खड्यातून रस्ता शोधत शोधत ही वाहतूक करावी लागत आहे. जणू काही या रोडवर खड्डेपूरच आलेला दिसून येत आहे .आणि या खड्डेपूर रस्त्यामुळे गाड्या सोबत अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील लोकांची हाडे मोडत आहेत, पण प्रशासन मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. प्रशासन एखाद्या मोटरसायकल चालकाचा ,किंवा ट्रॅक्टर चालकाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे काय ? अशा संतप्त प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे. अवसरी ,बेडशिंगे ,भाटनिमगाव, भांडगाव या गावांमधून ऊस गळीत हंगाम चालू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होत आहे, परंतु इंदापूर बेडसिंग, अवसरी ,रोड खोदाईमुळे बंद असल्यामुळे व अवसरी वडापुरी खड्डेपूर रोड मुळे, ऊस कारखान्यावर न्यायचा कसा हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना व ट्रॅक्टर मालकांना पडलेला दिसून येत आहे. काही लोकांनी तर कर्मयोगी कारखान्यावर जाऊन विनंती केली, अवसरी वडापुरी रोड वर खड्डेच खड्डे झाले आहेत, त्यामुळे ऊस वाहतूक करता येत नाही, कारखान्यातर्फे थोडा फार मुरूम टाकून त्या रस्त्याची डागडुजी करावी अशी विनंती काही ग्रामस्थांनी केली, परंतु कारखान्यांनी ही कोणतीच दखल आजपर्यंत तरी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अवसरी वडापुरी रोडचाही प्रश्न गंभीर झाल्याचे दिसत आहे .माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा आणली. सर्व तालुक्यातील रस्ते चकाचक केले. परंतु अवसरी वडापुरी हा रस्ता कसा त्यांच्या लक्षात राहिला नाही, हाच प्रश्न सर्वसामान्य शेतकरी वर्गांना पडलेला आहे .शेवटी सर्वसामान्य लोकांमध्ये एकच चर्चा आहे ,भरणे मामा कडून जरी हा रस्ता करायचा राहिला असेल, तरी ते परत लक्ष देऊन करतीलच, परंतु तात्काळ कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी तरी मुरूम टाकून या रस्त्याची डागडूजी त्वरित करावी . व इंदापूर बेडसिंग अवसरी खोदाईमुळे बंद झालेला रोड तात्काळ त्यामध्ये लक्ष घालून कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब यांनी यामध्ये मार्ग काढून तात्काळ रोड चालू करावा अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांमध्ये पडताना दिसत आहेत .
Home Uncategorized इंदापूर-बेडशिंगे-अवसरी-भांडगाव रस्त्याचा खेळखंडोबा- बळीराजापुढे आता एक नवीन संकट..