नवीन मेडिकल व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सेवा देण्याची उत्तम संधी – माजी राज्यमंत्री दत्त्तामामा भरणे.

👉 सुहास मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या नवीन मेडिकल दुकानाचे उद्घाटन भरणे मामांच्या हस्ते संपन्न्न.जाहिरात: सुहास मेडिकलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विशेषता निमगाव केतकी परिसरातील नागरिकांना दर्जेदार औषधे त्याचबरोबर चांगली सेवा देण्याची उत्तम संधी सुहास बनसोडे यांना प्राप्त झाली आहे असे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल निमगाव येथील सुहास मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.काल सुहास मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या नूतन मेडिकलचा दिमाखदार उद्घाटन सोहळा माजी राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
पुढे आ.भरणे म्हणाले की,आजकालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे समाजातील सर्व वर्गातील लोकांना अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात ओढले आहे. या आजारांशी सामना करताना औषधं सहज आणि माफक दरात उपलब्ध व्हावीत याकरिता सुहास मेडिकल अँड जनरल स्टोअर्स निश्चितच निमगावकरांना सेवा देईल तसेच या दुकानाचे मालक शेतकरी कुटुंबातील युवक सुहास बनसोडे असून त्यांचे शिक्षण सातारा येथे झाले आहे व त्यांना आपल्या भागातील लोकांविषयी तळमळ असल्यामुळेच त्यांनी सेवा करण्याचे हेतूने निमगाव केतकी येथे मेडिकल दुकान चालू केले आहे व ते या सेवेत कमी पडणार नाहीत असा आत्मविश्वास वाटतो असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. 
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ, माजी सभापती पंचायत समिती इंदापूर देवराज जाधव, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादी इंदापूर तालुका महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर, निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे, कचरवाडीचे सरपंच पैलवान के.के., सुवर्णयुग संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र आप्पा चांदणे, संघटन सरचिटणीस भाजपा राजू जठार, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ तात्या डोंगरे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सत्यशील पाटील,नानासाहेब हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाची प्रस्तावना अशोक बनसोडे सर यांनी केले तर आभार तात्यासाहेब बनसोडे यांनी व्यक्त केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here