PDCC मध्ये पुन्हा एकदा अप्पासाहेब जगदाळे यांच्याच नावाचा दरारा,अप्पासाहेब जगदाळे झाले बिनविरोध संचालक.

इंदापूर: पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रतिष्ठित मानली जाते.संपूर्ण जिल्ह्याचा आर्थिक केंद्रबिंदू म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाहिले जाते. नुकतेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी आज बुधवारी (ता.२२) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता.इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रणजीत निंबाळकर यांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ व दांडगा अनुभव व संघटन कौशल्य या असणाऱ्या पैलू मुळे अप्पासाहेब जगदाळे यांचे पारडे जड होते .माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही तिसरी निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यापूर्वी निरा भिमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यात पाटील व जगदाळे यांना यश आले होते.त्यानंतर आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करून आप्पासाहेब जगदाळे यांनी विजयाची हॅट्रिक साधली.गेली १९ वर्ष “अ” वर्ग सोसायटी प्रतिनिधी मतदारसंघात आप्पासाहेब जगदाळे हे संचालक म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. पुन्हा एकदा पाच वर्षासाठी त्यांना संधी मिळाली. या निवडणुकीच्या विजयामुळे आता हर्षवर्धन पाटील व अप्पासाहेब जगदाळे यांचा तालुक्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण करण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here