अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निर्विवाद विजय मिळवला आहे. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने या बँकेवर वर्चस्व निर्माण केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदासाठी अशोक पवार, विकास दांगट व दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची चर्चा होती. पण बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांनी दिगंबर दुर्गाडे यांना तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना संधी दिली आहे.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली तरी एका जागेवर मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज शनिवारी (दिली. 15) झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे सलग सात वर्ष जिल्हा बॅंकेवर अध्यक्ष होते.आता या निवडणुकीतही त्यांची बिनविरोध संचालक पदी निवड झाली होती. रमेश थोरात यांना पुन्हा एकदा जिल्हा बॅकेच्या अध्यक्षपदी संधी मिळेल अशी अपेक्षा थोरात समर्थकांना होती. मात्र या दोन्ही पदांसाठी पवार आणि वळसे यांच्या मर्जीतील संचालकाची निवड झाल्याची चर्चा या निवडीवरून होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. सुरेश घुले यांच्या विजयासाठी स्वतः अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. प्रचार सभेचे वेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहनही त्यांनी केलं होतं. परंतु या सर्व घडामोडी आता जुन्या झाले असून आता अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना महाराष्ट्रातील आद्य क्रमात असलेली पिडीसीसी बँक हिच्या विकासावर व शेतकऱ्यांच्या हितावर वेळ देण्याची गरज आहे व बँकेची उत्तरोत्तर प्रगती होण्याचे नवीन पदाधिकाऱ्यांवर एक प्रकारचे आव्हान आहे.