एक्सप्रेस मराठी न्युज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.नं.7776027968
केडगाव: कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना मुक्त गाव अभियानांतर्गत आज वाखारी ता. दौंड ग्रामपंचायत येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उदघाटन दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखाताई पोळ मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. दौंड तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर जास्त लसीकरण करून घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे मत पोळ मॅडम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेबिन कापून उदघाटन करण्यात आले . वाखारी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोनामुक्त गाव अभियान समितीतील पंचवीस जणांना नियुक्तीपत्रक देण्यात आले. आलेल्या मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने नारळ,शाल आणि गुलाबाचे फुल याला फाटा देत सॅनिटायझर बॉटल आणि मास्क देऊन करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संकल्पना तालुका समन्वयक मयूर सोळसकर यांनी मांडली,भारतीय जैन संघटना आपत्तीमध्ये चांगले काम करत असून त्यामध्ये भूकंप,दुष्काळ,महापूर, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पुनर्वसन, कोरोना मध्ये मयत पावलेल्या पालकांच्या मुलांचे पुनर्वसन, आशिया खंडातील सर्वात मोठ्या धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोना नियंत्रण, चारा छावणी आदी उपक्रमांमध्ये भारतीय जैन संघटनेचे उत्तम कार्य असल्याची माहिती मयूर सोळस्कर यांनी दिली. आणि त्याच धर्तीवर कोरोना मुक्त गाव अभियान अंतर्गत तालुक्यातील आतापर्यंत 35 गावांमध्ये जाऊन समित्या तयार करण्यात आलेले आहेत. लवकरच उर्वरित गावांमध्ये जाऊन अशाच पद्धतीने चांगलं काम केले जाईल अशी माहिती मयूर सोळसकर यांनी बोलताना दिली. त्यावर आधारित मनोगत अशोक वनवे , हर्षल भटेवरा , झुंबरआप्पा गायकवाड, डॉक्टर सुरेखाताई पोळ , धनाजीभाऊ शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन सरपंच सौ शोभाताई धनाजीभाऊ शेळके ,उपसरपंच भगवान नागू कुंभार , पोलीस पाटील , ग्रामपंचायत सदस्य मछिंद्र शेळके, शिवाजी भापकर तसेच सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक विकास झाडगे भाऊसाहेब यांनी केले होते.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान सदस्य झुंबरआप्पा गायकवाड, जवाहरलाल विद्यालयाचे सचिव आणि तंटामुक्ती अध्यक्ष धनाजीभाऊ शेळके, केडगाव विभागाचे मंडलाधिकारी श्री परदेशी भाऊसाहेब, सरपंच सौ शोभाताई शेळके,गाव कामगार तलाठी प्रियांका सुंदर्डे मॅडम, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, जिल्हा सचिव मनोज पोखरणा, प्रितम गांधी अध्यक्ष केडगाव, रवींद्र शहा अध्यक्ष यवत, सुनील भटेवरा अध्यक्ष राहू, अशोक वनवे तालुका समन्वयक दौंड, मयूरआबा सोळसकर तालुका समन्वयक दौंड, केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे नानासाहेब जगताप तसेच वाखरी ग्रामपंचायतच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर सोळसकर यांनी केले तर आभार शिवाजी भापकर यांनी व्यक्त केले.