उपसंपादक निलकंठ भोंग
निमगाव केतकी येथील जिल्हा परिषदेच्या भोसले वस्ती शाळेस B.S.S मायक्रो फायनान्स लि. तर्फे सी.एस.आर योजनेअंतर्गत दीड लाख रुपये किमतीचे शालेय उपयोगी साहित्य यामध्ये टेबल, खुर्च्या तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँच भेट देण्यात आले.
यावेळी बोलताना B.S.S मायक्रो फायनान्स लि. एरिया मॅनेजर अनुप टांगडे म्हणाले की, खाजगी शाळांना खूप मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवल्या जातात. त्यामानाने जिल्हा परिषद शाळेत सुविधांचा अभाव जाणवतो. त्यामुळे B.S.S मायक्रो फायनान्स लि. कडून महाराष्ट्रभर जिल्हा परिषद शाळांसाठी असे अनेक उपक्रम राबवले जातात. भविष्यातही आम्ही या शाळेसाठी जे काही करता येईल ते नक्की करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.यावेळी B.S.S मायक्रो फायनान्स लि. बँक मॅनेजर दीपक चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्जेराव जाधव, दत्तात्रय मिसाळ, मुख्याध्यापिका राजश्री कुदळे शिक्षक प्रणिता शेंडे, समाधान भोंग तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.