हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याची मोठी संधी- आमदार दत्तात्रय भरणे यांचे विश्व माऊली हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी मत.

👉 विश्व माऊली हॉस्पिटलचे उद्घाटन मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.
बारामती: मा. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते 18 डिसेंबर रोजी विश्व माऊली हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभ पार पडला. अतिशय घरगुती व खेळीमेळीच्या वातावरणात हा उद्घाटन समारंभ पार पडला. घोरपडवाडी तालुका इंदापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक व अतिशय हुशार व्यक्तिमत्व श्री. पंढरीनाथ कृष्णा पिसे सर व आई सौ. संजीवनी पंढरीनाथ पिसे यांचे चिरंजीव डॉ वासुदेव पंढरीनाथ पिसे हे लहान पणापासूनच अभ्यासू वृत्ती मुळे त्यांनी शिक्षणामध्ये भरारी घेतली. त्यांनी बांधलेले या हॉस्पिटलचे उद्घाटन भरणे मामा यांच्या हस्ते झाले.या उद्घाटन प्रसंगी भरणे मामा म्हणाले की “हॉस्पिटलच्या माध्यमातून जनसेवा करण्याची ही चांगली संधी आहे आणि डॉक्टर पिसे हे गरिबीतून वर आलेले व्यक्तिमत्त्व असल्याने ते जनसेवा करण्यास कमी पडणार नाहीत असा माझा विश्वास आहे “असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केले.डॉ वासुदेव पंढरीनाथ पिसे यांचे शालेय शिक्षण बोरी या मामांच्या गावी झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण गोंतडी ता. इंदापूर येथे झाले. उच्च शिक्षण MBBS मेरीट मधून B.J‌.मेडिकल कॉलेज & ससून हॉस्पिटल पुणे येथे झाले व M.S (जनरल व लपरोस्कोपी सर्जन ) ही पदव्युत्तर पदवी ग्रांट मेडीकल कॉलेज व जे.जे हॉस्पिटल मुंबई. F.MAS ही दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रियेची फेलोशिप मुंबई येथून उत्तीर्ण झाले. काही काळ पुणे येथे नोकरी केल्यानंतर ते बारामती या ठिकाणी रुग्ण सेवा देण्यासाठी आपल्या स्वतःच्या सुसज्ज अशा विश्व माऊली हॉस्पिटल च्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यासाठी त्यांनी सुसज्ज असे हॉस्पिटल उभारले आहे .नुकताच विश्व माऊली हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभ इंदापूर तालुक्याचे आमदार श्री. दत्तात्रेय मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी घोरपडवाडी ,बोरी ,बारामती परिसरातील सर्व मान्यवर उपस्थितीत होते. नेतेमंडळी पाहुणे नामवंत डॉक्टर डॉ. अशोक तांबे अध्यक्ष IMA महाराष्ट्र राज्य डॉ. दिलीप गांधी अध्यक्ष बारामती हॉस्पिटल डॉ.अविनाश आटोळे अध्यक्ष IMA डॉ. सौरभ मुथा सचिव IMA बारामती डॉ. विभावरी सोळुंखे मेडिकोज गिल्ड बारामती डॉ.गणेश बोके MD हृदयरोग तज्ञ कार्यक्रमास उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सौ. स्नुशा सुचिता पिसे यांनी तर डॉ. वासुदेव पिसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सौ.मनीषा गोरे व चि. समीर गवळी यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here