श्री. स.तु.कदम विद्यालयात 51 वा वार्षिक कला-क्रीडा महोत्सव संपन्न.

वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर:-जीवन विकास शिक्षण संस्थेचे श्री. स. तु. कदम प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय,पालघर मंगळवार दि.27 डिसेंबर रोजी 51वा वार्षिक कला-क्रीडा महोत्सव मा. वागेश कदम साहेब, कार्याध्यक्ष जी.वि.शि.संस्था, पालघर तथा जिल्हाध्यक्ष पालघर भारत स्काउट्स अँड गाईड्स यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.नवनाथ जगताप पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,मा.सुहास व्हनमाने जिल्हा क्रीडा अधिकारी ,मा. प्रकाश वाघ पालघर तालुका क्रीडा अधिकारी, मा. प्रफुल्ल घरत संस्था प्रतिनिधी यांच्या उपस्थित विविध खेळ, विज्ञान,भाषा, गणित, ब्रेन लॅब, संगीत दालन,रांगोळी,कार्यानुभव, भूगोल,शै साहित्य या सारख्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले उत्कृष्ट कवायत, लेझीम यांच्या साहाय्याने पाहुण्यांचे स्वागत केले.संस्थापदाधिकारी,मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, समन्वय समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीने यशस्वी झाला.
. . स्काऊट गाईड युनिट तर्फे “खरी कमाई” उपक्रमा अंतर्गत फूड स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक रविंद्र नाईक सर यांनी केले.तर सूत्रसंचालन अंकिता राय मॅडम यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here