सकारात्मक बातमी:अवसरीत महिलांच्या शेती शाळेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद.कृषी विभाग इंदापूर यांचे कौतुकास्पद कार्य.

इंदापूर:महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मा.तालुका कृषी अधिकारी श्री.भाऊसाहेब रुपनवर व मा. मंडळ कृषी अधिकारी श्री.गणेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या शेती शाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या शेती शाळेमध्ये कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना व सर्व पिकांवर शेतकऱ्यांना व शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी महिलांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्या निमित्ताने कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी महिलांना मिळत आहे. त्यामुळे कृषी विभाग इंदापूर यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे .मौजे अवसरी येथील शिवाजीनगर येथे क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाचे महिलांच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शेती शाळेमध्ये हरभरा पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, घाटे अळी व मित्र किडींची ओळख तसेच कामगंध सापळे वापर व व्यवस्थापन याविषयी उपस्थित महिलांना कु. अनुपमा देवकर कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले .तसेच श्री. गोरख साळुंखे यांचे क्षेत्रावर पीक परिसंस्था निरीक्षणे कशी घ्यावीत याबाबत प्रात्यक्षिक दाखवले. हरभरा पिकामध्ये सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क फवारणी फायदेशीर ठरते. घाटे अळी आर्थिक नुकसान पातळी म्हणजे( १-२ अळ्या प्रति मीटर ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट ३ ग्रॅम प्रती १०लिटर पाण्यातून मिसळून फवारणी करावी. घाटे अळी नियंत्रणासाठी एकरी ५ कामगंध सापळे व पक्षी थांबे लावावेत असे आवाहन कृषी विभाग करीत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here