केळवेरोड येथे बिल्डरने केली ग्राहकांची १ कोटी ९६ लाखांची फसवणूक.

वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
👉 इमारतीची एकही वीट न बांधता १ कोटी ९६ लाख रुपयांची ९१ ग्राहकांची केली फसवणूक
👉 पाच प्रोजेक्टर इसमावर सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पालघर तालुक्यातील केळवे रोड येथे एका बिल्डरने इमारत बांधून सोयी सुविधा देत गुंतकदारांना खोटी माहिती देऊन प्रोजेक्टमध्ये ग्राहकांनी रक्कम गुंतवणूक केली होती. मात्र त्या ठिकाणी कुठलेही बांधकाम व विकास काम केले नसल्याचे ग्राहकांच्या निदर्शनात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार भाईंदर येथील गुंतुकदाराने पोलीस ठाण्यात तक्रार देत ५ प्रोजेक्टरदारांवर सफाळे पोलीस ठाण्यात फसवणूकीचा शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळवे रोड येथे कर्म ब्रह्मांड ऑफोडेबल होम्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी २०१७ रोजी प्रोजेक्ट तयार करून इमारत उभी करण्याची खोटी माहिती गुंतवणूकदारांना देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष पाच वर्षात कुठल्याही प्रकारे एक वीट न रचता इमारत उभी केली नाही. त्यानुसार आमिषाला बळी पडत ९१ गुंतवणूकदारांनी १ कोटी ९६ लाख ६१ हजार २०९ रुपये घेऊन ठेवी रक्कम बदल्यात फ्लॅट देण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सदरच्या जागेत पाच वर्षात एकही वीट न बांधता कुठल्याही प्रकारे बांधकाम किंवा इतर विकासकाम सुरू केले नाही. त्यामुळे ग्राहकांची लूट करुन फसवणूक केली असल्याचे गुंतवणूकदारांना लक्षात आले.
त्यानुसार भाईंदर येथील गुंतकदार जॉर्ज लुईस परेरा यांनी सफाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सहहयक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, उपनिरीक्षक रिजवाना ककेरी घटनास्थळी जाऊन पाहणी असता बांधकाम आढळले नाही.
त्यानुसार सदर जागेचे संचालक रमाकांत सुभाष जाधव, नामदेव सुभाष जाधव, सतीश जी पिलंगवाड, मॅनेजिंग डायरेक्टर केतन बी पटेल, अशोक जे गाडगे अशा पाच प्रोजेक्ट इसमावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here