“टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नसतं,आणि वर्तमानात झिजल्याशिवाय भविष्य उजळत नसत”: अनिता सावे

साई स्पोर्ट्स अकादमी तलासरीचा वेगवान धावपटू अशी ओळख असलेला विशाल पारधी ,जन उत्कर्ष प्रबोधनी संचलित सौ.मुक्ता निवृत्ति जाधव महाविद्यालय कळमदेवी ,ता. डहाणू ,जि.पालघर या कॉलेजमधे टी.वाय. बी.ए. ला शिकत असलेला हा विद्यार्थी असून याची निवड ऑल इंडिया मुंबई युनिवर्सिटी रग्बी टीम साठी राष्ट्रीय स्तरावर सन २०२२-२३साठी ओरिसा -पुरी येथे झाली आहे . आदिवासी भागातील असे खेळाडू निवडून त्यांच्या मधे आत्मविश्वास निर्माण करून ,त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणी योग्य दिशा दाखविण्याचे काम चिंचणीच्या अनिता सावे पाटील या निस्वार्थिपणे गेली कित्येक वर्ष करतात.त्या पुढे म्हणाल्या की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नसतं,आणि वर्तमानात झिजल्याशिवाय भविष्य उजळत नसत.आदिवासी मुलांना पुढे नेण्यासाठी विलास हाडळ च्या मदतीने तलासरी य़ेथे त्यांनी स्पोर्ट्स अकादमी व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले . विलास हाडळ NIS चे प्रशिक्षण पूर्ण केलेला ॲथलेटिक्स असून या खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण देतो. या यशा मुळे विशाल पारधी चे सर्वत्र कौतुक होत आहे. या अकादमीमध्ये परिसरातील कित्येक विद्यार्थी तिथे प्रशिक्षण घेत असून यशाला गवसणी घालत आहेत.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here