इंदापूरच्या आदित्य शिंदे ला ज्यूदो स्पर्धेत गोल्ड मेडल.चमकदार कामगिरी करणाऱ्या आदित्यची राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत निवड.

इंदापूर येथे शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी पुणे विभागीय शालेय जुदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चार महानगरपालिका आणि तीन जिल्हे मिळून 336 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत इंदापूरच्या (मुळगाव: शेटफळ हवेली) आदित्य अभिजीत शिंदे याची चमकदार कामगिरी पहायला मिळाली.14 वर्षाखालील वयोगटातील 25 किलो वजनाच्या स्पर्धेत आदित्यने गोल्ड मेडल मिळवले एवढेच नव्हे तर त्याची राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत निवड करण्यात आली. श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूलचा हा विद्यार्थी आदित्य यास लहानपणापासूनच ज्युदो खेळाची आवड असल्याने त्याचे आजोबा शिवाजी (भाऊ) शिंदे यांनी दत्तात्रय व्यवहारे सर यांच्याशी संपर्क करून त्यास व्यवहारे सर यांच्या अकॅडमीत प्रवेश करून दिला.आदित्यनेही नित्यनियमाने रोजच्या रोज सराव करून मेहनतीने यशाचे शिखर गाठले. आता त्याची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही तो चमकदार कामगिरी करेल अशी आशा त्याचे मार्गदर्शक दत्तात्रेय व्यवहारे सर यांनी व्यक्त केली.इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा राज्य क्रिडा मार्गदर्शक शिवाजी कोळी तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले इंदापूर तालुका अँम्युचर ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे,अशोक चोरमले, आंतरराष्ट्रीय ज्युदो खेळाडू तेजश्री व्यवहारे, इंदापूर तालुका क्रिडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ यांच्या प्रमुख उपस्थित या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात केले होते.
यावेळी शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेत्या अतुल शेलार, राष्ट्रीय पंच सुधीर कोंडे वेल्सन ओहाळ इंदापूर तालुका अँम्युचर ज्यूदो असोसिएशनच्या उपाध्यक्षा जयश्री व्यवहारे, अजिनाथ बाळगाणुरे, सागर बनसुडे, सुनिल जाधव, रुपेश भालेराव, लक्ष्मण गडदे, अनिकेत व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.आदित्यने मिळवलेल्या या यशाबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवा नेते राजवर्धन पाटील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,शिवसेना तालुकप्रमुख नितीन शिंदे यांनी आदित्यचे अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here