पडस्थळचे नूतन सरपंच वैशालीताई मारकड व सदस्य रेश्माताई रेडके यांचा तेजपृथ्वी ग्रुप कडून सत्कार.

👉 तेजपृथ्वी ग्रुप कडून पडस्थळ ग्रामपंचायत सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सौ वैशालीताई मारकड व सदस्य पदी निवड झाल्याबद्दल रेश्माताई रेडके यांचा भव्य सत्कार संपन्न.
काल तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पडस्थळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सौ वैशालीताई मारकड व रेश्मा ताई रेडके यांचा सत्कार तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्षा अनिता खरात,गणेश भाऊ शिंगाडे ,लक्ष्मण वाघमोडे ,हनुमंत यमगर,गोकुळ कोकरे, सद्दाम बागवान,सुधीर पाडूले,नानासाहेब खरात,यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी अनिता खरात म्हणाल्या की वैशालीताई व रेश्मा ताई या कृषी उत्पन्न मार्केट समितीचे सभापती पांडुरंग तात्या मारकड व कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र दादा रेडके यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात पडस्थळ ग्रामपंचायत सर्वच बाबतीत एक नंबर वरती घेऊन जातील अशी आम्हाला आशा आहे.कारण पांडुरंग तात्या व महेंद्र दादा यांचे काम हे सर्व समाजाला व सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे असते.आणि त्यांनी नेहमीच जनसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या व युवक वर्ग विद्यार्थी यांच्या कामाला प्रधान्य दिले आहे आणि हीच प्रेरणा घेऊन वैशालीताई व रेश्मा ताई आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढील काळात पडस्थळ ग्रामपंचायत आदर्शवत ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आणतील यात काही शंका नाही.यावेळी सत्काराला उत्तर देताना पांडुरंग तात्या म्हणाले की सर्वांना बरोबर घेऊन पडस्थळ ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात एक नंबर करण्याचा प्रयत्न करू.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here