इंदापूर -खोरोची येथे सोमवारी दि.12 मध्यरात्री पडलेल्या दरोड्यामध्ये झालेल्या मारहाणीत दयाराम नारायण कणीचे (वय -70) यांचा जबर जखमी होऊन मृत्यू झाला. या दुर्दैवी कणीचे कुटुंबियांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.15) खोरोची येथे भेट घेऊन सांत्वन केले.या दरोड्यातील मारहाणीच्या घटनेमध्ये जनाबाई नारायण कणीचे (वय -60) या जबर जखमी असून त्यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कणीचे कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी सूचना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिनेश कणीचे व नातेवाईकांचे सांत्वन केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रकाश सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, आदिनाथ पाटील, राजू भाळे, राहुल कांबळे, सदाशिव किसवे, आप्पा पाटील, विनोद सावंत, संतोष साखरे, गणेश साखरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Home Uncategorized खोरोची येथील दरोड्याची घटना अतिशय दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी- माजी मंत्री...