धक्कादायक बातमी: पत्नीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेतच पतीचे स्टेजवर कोसळून निधन. वाचा याबद्दलचे सविस्तर वृत्त..

मुरुड (प्रतिनिधी: नसीर बागवान):-महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय चुरशीची निवडणूक मानली जाते .ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्व कामे बाजूला ठेवून दिवस दिवस गाठीभेटी घेणे व जनसंवाद करून मतपरिवर्तन करणे हे एकप्रकारचे धगधगतीचे काम बनलेले असते अशाच या धगधगीच्या जीवनामुळे पत्नीच्या प्रचार सभेतच पतीचे स्टेजवरच कोसळून निधन झाले आहे. याबद्दलची सविस्तर वृत्त असे की,लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अमर पुंडलिक नाडे (वय 45 वर्ष) यांचे आकस्मात निधन झाले आहे. मयत अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात त्यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.प्रचाराची जाहीर सभा सुरु असताना रात्री दहा वाजताच्या सुमारास अमर नाडे यांचा मृत्यु झाला. ते चालू भाषणात स्टेजवर कोसळले. मयत अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. ही घटना लातूर तालुक्यात घडली आहे.प्रचाराची जाहीर सभा सुरु असताना अमर नाडे हे भाषण करताना अचानक स्टेजवर कोसळले. त्यांना तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमर नाडे हे अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. परिसरातील सर्वसामान्य लोकांना पाहिजे ती मदत करून त्यांना एक प्रकारे आधार देण्यात ते अग्रेसर असायचे. त्यांच्या अचानक जाण्याने मुरुड परिसरासह जिल्हा मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अमर नाडे यांच्यावर आज दु. 12 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here