इंदापूर: शालेय विद्यार्थिनीचा वाहतूक अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेमध्ये योग्य ती सुधारणा व्हावी यासाठी जिल्हा परिषद सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांसमवेत निवेदन दिले होते. अंकिता पाटील ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनानंतर इंदापूर पोलीस स्टेशनने धडक कारवाई करीत वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा केली.या धडक कारवाईचे तसेच अंकिता पाटील ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांमध्ये कौतुक होताना दिसत आहे.पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई केली. या बेशिस्त वाहन धारकांचे वाहन चालविण्याचा परवाना देखील तपासण्यात आला. या धडक कारवाईमुळे वाहन धारकांची पळापळ झाली. तसेच इंदापूर शहरात जड वाहनांना बंदी घातली आहे. पोलीस प्रशासन वाहतूक व्यवस्थेची दक्षता घेत आहे.धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Home Uncategorized अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनानंतर इंदापूर पोलीस स्टेशनने धडक कारवाई करीत वाहतूक...