निमगाव केतकी-(प्रतिनिधी:मायादेवी मिसाळ)श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला,विज्ञान प्रदर्शन तसेच मैदानी स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या काटी, कळस,डाळज, निमगाव केतकी व खडकी या शाखेत गट पातळीवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या , यामध्ये काटी शाळेला प्रथम क्रमांक तसेच निमगाव शाखेला द्वितीय क्रमांक व कळस शाखेला तृतीय क्रमांक मिळाला़, हे सर्व तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुणे या ठिकाणी अंतिम स्पर्धेसाठी जाणार आहेत.त्याचबरोबर निमगाव केतकी या विद्यालयामध्ये रांगोळी,चित्रकला ,वृक्षारोपण , वि ज्ञान प्रदर्शन तसेच टाकाऊ पासून टिकाऊ बनविणे इत्यादी स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.विविध स्पर्धांचे उद्घाटन करण्यासाठी निमगाव पंचक्रोशीतील नागरिक व निमगाव केतकीचे विद्यमान सरपंच प्रवीण भैय्या डोंगरे उपस्थित होते.सरपंच प्रवीण भैय्या डोंगरे यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच तात्यासाहेब वडापुरे, अतुल आप्पा मिसाळ यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी श्री अमोल राऊत ग्रामपंचायत सदस्य निमगाव केतकी दादाराम शेंडे ग्रामपंचायत सदस्य निमगाव केतकी, नीलकंठ भोंग शाळा समिती अध्यक्ष, श्री मनोहर चांदणे (पत्रकार), श्री पप्पू शेख, श्री देवीदास शेंडे श्री सर्जेराव हेगडे, श्री धनाजी राऊत या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच लोकमत बाभूळगाव विभागाचे नवनियुक्त पत्रकार राजू लोंढे व जनता एक्सप्रेसचे संपादक श्रेयश नलवडे हेही उपस्थित होते. वेळी पत्रकार नीलकंठ भोंग, दत्तात्रय मिसाळ,अशोक घोडके यांच्या हस्ते शाळेच्या मैदानालगत वृक्षारोपण करण्यात आले.या प्रदर्शनासाठी सर्व पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक माननीय श्री चव्हाण आर डी तसेच उपमुख्याध्यापक श्री भोंग एमबी व पर्यवेक्षक खान सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.