सपकळवाडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटपाचा व कबड्डी किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अवघ्या देशभर वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पवार साहेब यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सपकळवाडी व अंगणवाडी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व कबड्डी किट वाटप तुषार सपकळ मित्रपरिवार यांच्यातर्फे करण्यात आलेे.यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ यांनी शरद पवार साहेबांचा संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.पूढे ते म्हणाले की पवार साहेब देशाचे पंतप्रधान व्हावेत हीच प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. पवार साहेबांच्या आशीर्वादाने व भरणे मामांच्या कार्यकुशलतेमुळे इंदापूरचा चेहरा मोहरा बदलला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भरणेमामांना अधिक बळ देऊन पक्ष वाढवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही सचिन सपकळ म्हणाले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन दादा सपकळ सपकाळवाडीचे जेष्ठ शिवाजी बापू सपकळ,शिवाजी जगन्नाथ सपकळ, पृथ्वीराज बापू सपकळ, सुनील भुजबळ, योगेश सपकळ, सुखदेव घाडगे, सरपंच तानाजी सोनवणेे, राष्ट्रवादी युवा कार्यकर्ते तुषार भैय्या सपकळ, महेश सपकळ, अजित सपकळ,  कन्हैया वाघमारेे, शुभम निंबाळकर, गणेश सपकळ, तुषार सोनवणे, ऋषिकेश सोनवणेे, नाळे सर, भुजबळ मॅडम उपस्थित होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here