शाळा चालवण्यासाठी सरकारच्या मदतीवर अवलंबून राहू नका, बाबासाहेब डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असं वक्तव्य राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा अनेक स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यातूनच पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याला १ लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं राजरत्न आंबेडकर यांनी जाहीर केलं.राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे आयोजित धम्म संमेलनात त्यांनी ही घोषणा केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. राजरत्न आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यासारखे आहेत आणि जर सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर ती थुंकी त्याच्याच तोंडावर पडते. मला वाटते काल परवा ती थुंकी काळ्या शाईच्या रुपात चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर पडली.”राजरत्न आंबेडकर यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांनी पाटील यांच्या तोंडावर शाई फेकण्याच्या कृत्याचे समर्थन केलं. समता सैनिक दलाच्या सैनिकाचे कौतुक करून त्यांना एक लाखांचे बक्षीस जाहीर केले.
Home Uncategorized मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस जाहीर. वाचा..कोणी केले...