बारामती:महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या चर्चांमध्ये चंद्रकांत पाटील यांचे विधान व त्या विधानानंतर त्यांच्यावर झालेली शाई याची जोरदार चर्चा चालू आहे पण यामध्ये आणखी एक गोष्टीचा उल्लेख सध्या होत आहे ती गोष्ट म्हणजे शाई फेकणार्याचा बारामतीत सत्कार करून चक्क त्याला 51 हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर झाले होते का? असा प्रश्न समोर येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर १४ जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचे बारामती कनेक्शन असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी फिर्याद दिली आहे .त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात ऋषी गायकवाड यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमेश्वर नगर परिसरात मोर्चाला संबोधित करत असताना गायकवाड यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर महाराष्ट्रात प्रथम जो शाई फेकेल, त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे येथे काळी शाई फेकली गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.शाई फेकणारा चा बारामतीत सत्कार करून त्याला 51 हजार रुपये बक्षीस देणार असेही गायकवाड यांनी जाहीर केले,असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्तेअविनाश मोटे, पांडुरंग कचरे,ज्ञानेश्वर माने, सुधाकर पांढरे, जगदीश कोळेकर, चंद्रकांत केंगार आधी कार्यकर्त्यांनी यावेळी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर अशाही पद्धतीने बारामतीचे कनेक्शन आहे अश्याच चर्चा रंगू लागले आहेत.
Home Uncategorized चंद्रकांत पाटीलांवर शाई फेकणाऱ्याला चक्क 51 हजार रुपये बक्षीस.काय आहे प्रकरण? कसे...