पळसदेव: पळसदेव (ता. इंदापूर) येथील एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे प्राचार्या वंदना बनसुडे यांनी आपल्या प्रास्ताविकात श्री.फिरंगाई क्रीडा महोत्सव कबड्डी स्पर्धेत नानासाहेब भापकर सर व पोपट हगारे सर यांनी सहकार्य केल्याबद्दल तसेच एल.जी बनसुडे विद्यालयामधील 14 व 17 वर्षे वयोगटातील मुलींनी कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक व 14 वर्षे मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक सागर बनसुडे यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्हील चेअर बास्केटबॉल खेळाडू मीनाक्षी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय जीवन जगत असताना आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण अशक्य गोष्टी शक्य करू शकतो तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोठे स्वप्न मनाशी बाळगून ती साकार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे असे सांगितले व विजेते खेळाडूंचे अभिनंदन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी सर्व विजेते खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे उपाध्यक्ष शितल कुमार शहा, कमल जाधव ,मोनाली जाधव ,सचिव नितीन बनसुडे ,अंकुश बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी व आभार प्रवीण मदने यांनी मानले.
Home Uncategorized शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती बाळगावी- मीनाक्षी जाधव (आंतराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू )