इंदापूर: शेटफळ तलावातून रब्बीच्या पिकांसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेटफळ तलाव बचाव कृती समितीने कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे मंडळाकडे केल्याची माहिती अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देतांना पाटील म्हणाले,रब्बीच्या गहू ,ज्वारी,हरभरा इ.पीकासाठी तलावातून टेल टू हेड असे आवर्तन तातडीने सोडून सिंचन करण्याबाबत शेतकरीवर्गाने विचारणा केल्यामुळे कृती समितीने कार्यकारी अभियंता,श्री.राजेंद्र धोडपकर,उपविभागीय अधिकारी श्री.अश्विन पवार व शाखाधिकारी श्री. सावंत यांच्याकडे मागणी केली आहे. समक्ष संपर्क साधून याबाबतचे लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात 4 लक्षवेधी मागण्या केल्या आहेत-
(1) तातडीने रब्बीसाठी आवर्तन सोडण्यात यावे.
(2) दारे क्रमांक एक ते तेवीस पर्यंत कॅनाॅलमध्ये साठलेला सर्व कचरा यंत्रांद्वारे काढून घेण्यात यावा.
(3) सर्व पाणी वापर संस्थांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात यावी. (4) कालवा निरीक्षकाची नेमणूक करण्यात यावी.अशा पद्धतीने शेटफळ तलाव बचाव कृती समितीने केलेल्या या प्रमुख 4 मागण्या मान्य झाल्यास शेतकऱ्यांना मात्र याचा नक्कीच फायदा होईल.
Home Uncategorized शेटफळ तलावातून रब्बीच्या पिकासाठी आवर्तन सोडण्याच्या मागणीसह शेटफळ तलाव बचाव कृती समितीने...