बिजवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दादाराम काळेल यांच्या भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा असुन यामध्ये काहीही तथ्य नसल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुपंत कोकाटे यांनी दिली.कालच राष्ट्रवादीचे सरपंच दादाराम काळेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाल्या होत्या,यावर श्री.कोकाटे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.ते म्हणाले की,आमची दादाराम काळेल यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे.ते राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असुन ते कधीही असे करणार नाहीत. त्याच बरोबर श्री.दादाराम काळेल यांनी सांगितले की,गावच्या विकासासाठी तसेच माझ्या कौटुंबीक अडचणीमुळे मी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.मात्र हा पाठिंबा केवळ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीपुरता मर्यादित असल्याने याचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा दुरान्वये संबंध नाही.मी आदरणीय मा.ना.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे. भरणे मामांच्या माध्यमातून आमच्या गावाला भरघोस निधी मिळाला असुन मामांमुळे गावामध्ये कधी नव्हे इतकी प्रचंड विकासकामे झाली आहेत.तसेच मलाही पक्षाने भरभरून दिले आहे.त्यामुळे मी राष्ट्रवादी मध्ये पुर्ण समाधानी आहे.त्यामुळे माझ्या भाजप प्रवेशाच्या निवळ अफवा असुन कोणीही यावर विश्वास ठेवू नये. तसेच लवकरच याबाबतीत आदरणीय भरणे मामांची चर्चा करून सविस्तर खुलासा करण्यार असल्याचेही श्री.काळेल यांनी सांगितले आहे.यावेळी कार्याध्यक्ष अतुल झगडे,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ,नगरसेवक पोपट शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.