वैभव पाटील :प्रतिनिधी: 9850868663
(प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले. भारत सरकार कायदा १९३५ ची जागा राज्यघटनेने देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या रचनाकारांनी ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले. भारतीय राज्यघटनेप्रती आदर व्यक्त होणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा होतो. ह्याच उद्देशाने मुंबईचे उपनगर असलेल्या मिरारोड येथील ‘आदर्श विद्यानिकेतन विद्यालया’त ‘अभिजात मराठी साहित्य सेवा संघ, महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने विद्यार्थी वर्गासाठी संविधानावर संवाद आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी शाळेत पार पडलेल्या वकृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना अभिजात मराठी साहित्य सेवा संघामार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख हृषिकेश सावंत यांनी ‘भारतीय संविधान हा आपला शाश्वत दस्ताऐवज आहे, भावी पिढीने तो आत्मसात करुन त्यास जपले पाहिजे’ हा विचार व्यक्त केला.विविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिजात साहित्य सेवा संघ सातत्याने वैचारिक, प्रबोधनात्मक मार्गाने कार्यरत राहून समृद्ध समाजनिर्मितीसाठी कटीबद्ध असेल असा विश्वास अभिजातचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी व्यक्त केलायाप्रसंगी शिवशक्ती शिक्षण सेवा संस्थेचे अध्यक्ष केसरीनाथ म्हात्रे, माध्यमिक वर्गाचे मुख्याध्यापक सोमवंशी , प्राथमिक वर्गाचे मुख्याध्यापक श्री.निलेश गोतारणे उपस्थित होते. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सहशिक्षिका दिपा पाटील, कैलास डोहाळे व शिक्षकवृंदाने विशेष मेहनत घेतली. समवेत अभिजातचे सचिव योगेश नंदा तुकाराम गोतारणे व उपाध्यक्ष तथा कविवर्य तुषार ठाकरे ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.